Home शहरं औरंगाबाद aurangabad News : ३० लाखांचे जेसीबी परस्पर विकले - jcbs worth rs...

aurangabad News : ३० लाखांचे जेसीबी परस्पर विकले – jcbs worth rs 30 lakh sold to each other


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bकिरायाने घेतलेले जेसीबी यंत्र भाडे न देता परस्पर विकून तीस लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी कारभारी तळेकर (रा. चिकलठाणा चौधरी कॉलनी) आणि किशोर मनोहर लखन यांची ओळख होती. या ओळखीतून किशोरने संभाजी तळेकर यांना जेसीबी विकत घेऊन भाड्याने देण्याबाबत सांगितले. तळेकर यांनी जेसीबी (एमएच २१ बीएफ ५९३१) विकत घेतले. किशोर लखन आणि तळेकर यांच्यामध्ये भाडेकरारही करण्यात आला. या भाडेकरारापोटी किशोर लखन यांनी तीन महिन्याचे भाडे आणि २५ हजार रुपये अतिरिक्त असे दोन लाख २५ हजार रुपये तळेकर यांच्या खात्यावर जमा केले. यानंतर चार महिन्यांपासून भाडे दिले नाही. यामुळे भाडे घेण्यासाठी तगादा लावला. तेव्हा हा जेसीबी हा प्रमोद लहाने (रा. अंबाजोगाई) याला विकल्याची माहिती मिळाली. प्रमोद लहाने याच्याकडे जाऊन जेसीबीबाबत बोलल्यानंतर किशोर लखन याने करारावर जेसीबी विकल्याचे सांगितले. याप्रकरणी तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संभाजी तळेकर यांच्या फिर्यादीवरून किशोर लखन आणि प्रमोद लहाने या दोघांविरोधात पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments