Home शहरं औरंगाबाद Aurangabad rape case: 'तो' नराधम धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर करायचा अत्याचार...

Aurangabad rape case: ‘तो’ नराधम धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर करायचा अत्याचार – aurangabad rape case 16 year old girl raped by man in naregaon


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचे धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अनिस पठाण (वय २६, रा. नारेगाव) याला अटक केली. या आरोपीला कोर्टाने ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश सुनावले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०१९पासून नारेगाव कचरापट्टीजवळ राहत असलेल्या एका १६ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अनिस पठाण (वय २६, रा. नारेगाव) हा वेळोवेळी अत्याचार करत होता. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनिस पठाण या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला न्यायलयात हजर केल्यानंतर आरोपीची वैदयकीय तपासणी बाकी आहे. आरोपीने पीडितेचे फोटो काढले, असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानुसार आरोपीचा मोबाइल जप्त करायचा आहे. गुन्हा करण्यास आरोपीला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी न्यायलयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायलयाने आरोपीला तीस जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.

Suicide Attempt: नवरा टीव्ही घेत नाही म्हणून मुलांना विष पाजून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ‘त्या’ २७ जणांचे नोंदवले जबाबSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

gujarat coronavirus: एक अॅम्ब्युलन्स अन् चार मृतदेह… गांधीनगरमध्ये करोनाने होणारे मृत्यू लपवले जाताहेत? – gujarat coronavirus dead bodies in ambulance photo viral nitin patil...

अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( gujarat coronavirus ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका...

Recent Comments