Home क्रीडा aus vs ind 4th test: AUS vs IND 4th Test day 3:...

aus vs ind 4th test: AUS vs IND 4th Test day 3: भारताच्या शेपटाने ऑस्ट्रेलियाला रडवले, सुंदर-ठाकूर यांची विक्रमी भागिदारी – aus vs ind 4th test day 3 highlights shardul thakur, washington sundar bring india back on day 3


ब्रिस्बेन:aus vs ind 4th test day 3 highlights भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात विकेट न गमावता २१ धावा केल्या. यजमान संघाकडे ५४ धावांची आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ गाजवला तो भारताच्या वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी, या दोघांनी वैयक्तीक अर्धशतक पूर्ण केली आणि सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रडवले.

वाचा- रैनाची शानदार गोलंदाजी; विकेट नव्हे तर रनआउट केले, पाहा व्हिडिओ

तिसऱ्या दिवशी भारताने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजासह डावाची सुरूवात केली. या जोडीने संघाचे शतक पूर्ण केले. त्यानंतर पुजारा २५ धावाकरून बाद झाला. त्या पाठोपाठ अजिंक्य रहाणे ३८ धावांवर माघारी परतला. भारताचे कसोटी फलंदाज बाद झाल्यानंतर मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच ऑस्ट्रेलियाने मयांकला ३८ वर तर पंतला २३वर बाद करून भारताची अवस्था ६ बाद १८६ केली. भारत अध्याप १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि मैदानात पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर आणि फक्त एका कसोटीचा अनुभव असलेल्या शार्दुर ठाकूर फलंदाजी करत होते. पण सुंदर आणि ठाकूर या जोडीने त्यानंतर जे काही केले त्याने इतिहास घडवला.

वाचा- गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ

सुंदर आणि ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली. ठाकूर आणि सुंदर यांनी कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावले. सुंदरचे पदार्पणातील अर्धशतक ठरले. ठाकूरने ११५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६२ तर सुंदरने ११५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६७ धावा केल्या. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्ठात आला.

वाचा- पिचमुळे नव्हे तर खरी गुणतवत्ता; सचिनने व्हिडिओ शेअर करून केले भारतीय गोलंदाजाचे कौतुक

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात जोश हेजलवडूने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. यजमान ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण भारताच्या तळातील फलंदाजांनी शानदार फलंदाजीकरत ऑस्ट्रेलियाला फक्त ३३ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लावले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Girgaon Chowpatty: गिरगाव चौपाटीवरून समुद्रकिनाऱ्याचे दर्शन – darshak gallery for tourism on girgaon chowpatty

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसमुद्राची गाज, खळाळणाऱ्या लाटा, भणभणारा वारा...अशी सुरेल मैफल अनुभवण्यासाठी लवकरच पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर दर्शक गॅलरी साकारली जाणार आहे. मुंबई...

BJP Agitations: पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र ‘हे’ घडले – bjp agitation in various parts of the state demanding justice for...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्याय मिळाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात...

Jasprit Bumrah: चौथ्या कसोटीसाठी माझा विचार करू नका; भारताच्या गोलंदाजाने BCCIला केली विनंती – jasprit bumrah released from india’s squad ahead of the fourth...

हायलाइट्स:भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार नाहीवैयक्तीक कारणामुळे बुमराहने घेतली माघारचौथी कसोटी चार मार्चपासून सुरू होणार अहमदाबाद: भारत आणि...

छत्रपती शिवाजी महाराज: मोठ्या पडद्यावर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, बॉलिवूड अभिनेता पेलणार शिवधनुष्य – chhatrapati shivaji maharaj shahid kapoor may play his role...

हायलाइट्स:अश्विन वर्दे करणार महाराजांच्या आयुष्यावर बायोपिकशाहिद कपूरला करण्यात आली विचारणारितेश देशमुखदेखील करणार महाराजांवर चित्रपटमुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक नावाजलेल्या व्यक्तिंच्या...

Recent Comments