करोना: स्पेनमध्ये दोन महिन्यानंतर शंभरहून कमी मृतांची नोंद
या ठरावाच्या माध्यमातून निष्पक्ष, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या ठरावात कुठेही चीनचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या या पुढाकारामुळे चीनचा मात्र संताप झाला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाला बिफ आयातीवर बंदी घालण्याची धमकीच दिली आहे. शिवाय इतर आयात होणाऱ्या वस्तूंवर कर वाढवण्याचाही इशारा दिलाय. सोमवारी रात्री होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत ऑस्ट्रेलियाकडून आरोग्य मंत्री ग्रेग हंट हे प्रतिनिधित्व करतील.
अमेरिकेचा चीनवर हल्लाबोल सुरूच
करोना व्हायरसच्या प्रसाराला चीनच जबाबदार असल्याचं सांगत अमेरिकेकडून चीनविरोधात हल्लाबोल सुरुच आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी चीनवर आता एक मोठा आरोप केला आहे. करोनाचा प्रसार कसा होतो हे चीनला माहित असूनही त्यांनी जाणिवपूर्वक आपल्या लोकांना इतर देशात जाऊ दिलं, असा आरोप त्यांनी केला. जगासाठी धोका निर्माण करणारे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतले जातात. करोना व्हायरस पसरत असतानाही चीनचे लोक जगभरात का फिरत होते? चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला याचं उत्तर माहित असेल. कारण, करोनाचा प्रसार होईल हे फक्त त्यांनाच माहित होतं, असा आरोप पॉम्पियो यांनी केला.
होय…करोना व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट केले: चीन
आपल्याला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी कोणतही बातचीत करायची नसल्याचं एकीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तर दुसरीकडे पॉम्पियो यांनी हा गंभीर आरोप केला. डिसेंबरमध्ये चीनला व्हायरसबाबत सर्व माहिती मिळाली होती. त्यांचे निर्णय पाहिले तर मी सांगितलंय त्या प्रमाणेच आहेत, असं ते म्हणाले. अमेरिकेने सर्वात अगोदर चीनहून येणारी विमाने रोखली. पण तोपर्यंत युरोपात प्रसार झाला होता. मग युरोपातून येणारी विमानेही रोखली, असं त्यांनी सांगितलं.