Home शहरं मुंबई Ayush doctors: ayush doctors: धक्कादायक; करोना निवारण्याचं ट्रेनिंग घेऊन ९८ हजार डॉक्टर...

Ayush doctors: ayush doctors: धक्कादायक; करोना निवारण्याचं ट्रेनिंग घेऊन ९८ हजार डॉक्टर गायब! – lakhs of ayush doctors of maharashtra get trained but even 2 percent not seeing corona patients


मुंबई:करोना रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावा म्हणून सुमारे एक लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण त्यापैकी केवळ दोन टक्के म्हणजे १५०० डॉक्टरांनीच प्रत्यक्ष सेवा द्यायला सुरुवात केली आहे. बाकीचे डॉक्टर अद्यापही सेवेत हजर झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

करोनाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने नुकतचं आयुष डॉक्टरांना परवानगी दिली. त्यानंतर या डॉक्टरांना एप्रिल महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षणही देण्यात आलं. गरज पडल्यास या डॉक्टरांनी करोना रुग्णांच्या सेवेत हजर रहावे या उद्देशानेच त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. राज्यात सुमारे दीड लाख आयुष डॉक्टर आहेत. त्यापैकी एक लाख डॉक्टरांनी हे प्रशिक्षण घेतलं. मात्र, यापैकी केवळ दीड हजार डॉक्टरच प्रत्यक्ष सेवेत सहभागी झाले आहेत. या दीड हजार डॉक्टरांना राज्यातील वेगवेगळ्या भागात पोस्टिंग देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य शिक्षण सचिव संजय मुखर्जी यांनी दिली.

आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणं हे आमचं काम होतं. ते आम्ही केलं. एप्रिल महिन्यात एक लाख डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांची नियुक्ती करण्याचं काम डायरेक्ट्रेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचं आहे, असं महाराष्ट्र आयुषचे संचालक डॉ. कुलदीप कोहली यांनी सांगितलं. प्रशिक्षण दिल्यानंतरही आयुष डॉक्टर सेवेत हजर झालेले नाहीत. अॅलिओपॅथीच्या डॉक्टरांना नोटीस मिळते तर आयुष डॉक्टरांना नोटीस का पाठवली जात नाही? असा सवाल मेडिकल इंडियन असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला. मुंबईपासून राज्यभरात डॉक्टरांची कमतरता असल्याचं प्रत्येकाला माहीत आहे. अशावेळी प्रशिक्षण घेऊनही फक्त दीड हजार डॉक्टरांनी सेवेत दाखल होणं ही खेदाची बाब आहे. सरकारने तात्काळ या डॉक्टरांना नोटीस पाठवायला हवी. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी आयुष डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला आम्ही अनेकदा दिला आहे, असंही भोंडवे म्हणाले.

वडील घराबाहेर पडताच तो पाणी पिऊन झोपायला गेला आणि…

लॉकडाऊनचं उल्लंघन, पिता-पुत्राचा कोठडीत मृत्यू; काँग्रेसकडून न्यायाची मागणीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona vaccination in mumbai: निर्धारित वेळेत उद्दिष्टपूर्ती कठीण? – first phase of corona vaccination will be not complete on time due to technical problem

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठीचे कोविन अॅप मुंबईतील काही लसीकरण केंद्रांमध्ये शुक्रवारी सुरळीत सुरू झाले असले, तरीही अद्याप ग्रामीण भागामध्ये ते...

Recent Comments