Home क्रीडा Babita Kumari: वादग्रस्त बबिता फोगटचं नवं ट्विट, आता म्हणाली... - indian women...

Babita Kumari: वादग्रस्त बबिता फोगटचं नवं ट्विट, आता म्हणाली… – indian women wrestler babita kumari’s new twit goes viral


गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेच आली ती भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगट. यापूर्वी बबिताने तर थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा बबिताने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बबिता नेमकी काय म्हणतेय, जाणून घेऊया…

पालघर येथे मॉब लिंचिंगची घटना घडली होती. पण या घटनेच्या काही दिवसांनंतर बबिताने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये बबीताने म्हटले आहे की, ” महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे.”

बबिताच्या या पोस्टनंतर एकच गदारोळ झाला होता. कारण बबिताने थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. सध्याच्या घडीला परिस्थितीचे भान बबिताला नाही, अशी टीका तिच्यावर करण्यात आली. त्याचबरोबर बबिताला ट्विटरवरही बऱ्याच जणांनी ट्रोल केले होते. तबलिगी जमातबाबत वादग्रस्त पोस्ट करणारी बबिता फोगटविरोधात महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बबीताच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे बबिताविरोधात औरंगाबाद शहर चौकातील पोलिस स्थानात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता बबिता या तक्रारीविरोधात नेमके काय पाऊल उचलते, याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे. पण ही तक्रार महाराष्ट्रात दाखल करण्यात आली, म्हणून बबिता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर राग काढत आहे का, अशीही चर्चा सुरु आहे.

kumari

आता बबिताने एक ट्विट केले आहे. हे ट्विट लग्नासंबंधांतील आहे. सध्याच्या घडीला लॉकडानमध्ये लग्न होत आहेत. पण ही लग्न कमी लोकांमध्ये होत आहेत. याबाबत बबिताने एक ट्विट केले आहे. आता बबिताने नेमके काय म्हटले आहे, ते पाहूया…

बबिताने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” आजकाल ५-१० जणांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. करोना व्हायरसच्या जाण्यानंतरही हीच परंपरा कायम राहिली तर मुलींचे वडिल कर्जात बुडणार नाहीत. माझे देशवासियांना आवाहन आहे की, ही गोष्ट यापुढेही चालूच ठेवा. त्यामुळे देश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Recent Comments