Home क्रीडा babita phogat : ठाकरे सरकार झोपा काढतंय का? बबीताची टीका - babita...

babita phogat : ठाकरे सरकार झोपा काढतंय का? बबीताची टीका – babita phogat slams maharashtra govt. on palghar issue


महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या सामूहिक हत्या कांडावर आता देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. कारण पालघरमध्ये दोन साधू, एक ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या वादात आता भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबीता फोगटने उडी घेतली आहे. बबीताने, ठाकरे सरकार झोपा काढतंय का? अशी जहरी टीका केली आहे.

पालघर येथे शुक्रवारी मध्यरात्री नाशिककडे जात असताना सुमारे शंभर जणांच्या जमावांनी चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला. मॉब लिंचिंगच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून राजकारणही रंगले आहे.

पालघर येथील मॉब लिंचिंगची घटनेबाबत बबीताने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बबीताने म्हटले आहे की, ” महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे.”


काही दिवसांपूर्वी बबीताने तबलीगी जमातवर जोरदार टीका केली होती. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर बऱ्याच जणांनी टीकाही केली होती.या पोस्टमध्ये बबीताने, करोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. तर ‘तबलिगी जमात’ ही अद्याप नंबर एकवर आहे, असे लिहीले होते.

पालघर येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, असा इशारा देतानाच पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात मॉब लिंचिंग सारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. साधूंवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असल्याचं मी सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments