दरम्यान, सध्या लॉकडाउनच्या काळात बचतगटांच्या अडचणी वाढल्या आहेत. या काळात बचतगटांचे कामकाज बंद आहे. उन्हाळ्यात अनेक बचतगट वाळवणाचे पदार्थ तयार करतात. मात्र, लॉकडाउनमुळे या पदार्थांना मागणी घटली आहे. त्यामुळे या काळात बचतगटांनी कापडी मास्क तयार करण्यास सुरुवात केली. राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मास्क तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती विभागातील ३ हजार १३५ बचतगटांनी ११ लाख १९ हजार मास्क तयार केले आहेत. औरंगाबाद विभागात ९१० बचतगटांनी १२ लाख ३६ हजार, तसेच कोकण विभागातील ६५४ बचतगटांनी १० लाख २२ हजार, नागपूर विभागातील ८७६ बचतगटांनी ६ लाख ७५ हजार, नाशिक विभागातील ५९९ बचतगटांनी ९ लाख ४६ हजार आणि पुणे विभागातील ८६८ बचतगटांनी जवळपास १२ लाख ५ हजार मास्क तयार केले आहेत.