Home महाराष्ट्र bail granted to areeb majeed: IS कनेक्शन: संशयित अरीब मजीदला मोठा दिलासा...

bail granted to areeb majeed: IS कनेक्शन: संशयित अरीब मजीदला मोठा दिलासा – bombay high court rejects nia’s plea seeking cancellation of bail granted to areeb majeed


हायलाइट्स:

  • अरीब मजीदला जामीन मंजूर
  • न्यायालयाचा एनआयएला झटका
  • जामीन देताना खंडपीठाने अरीब मजीदला घातली अनेक बंधने

मुंबईः सीरियामधील ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याच्या आरोपामुळे कोठडीत असलेला कल्याणमधील संशयित तरुण अरीब मजीदला अखेर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. जवळपास सहा वर्ष आणि तीन महिन्यांनंतर अरीबची जामीनावर सुटका होणार आहे. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि हमीदार देण्याच्या अटीवर अरीबला जामीन देण्यात आला आहे.

अरीबविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) या दहशतवादविरोधी कायद्याखाली २०१४मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर त्याने जामिनासाठी केलेले अर्ज एनआयए न्यायालयाने व उच्च न्यायालयानेही फेटाळले होते. १७ मार्च २०२० रोजी विशेष एनआयए कोर्टाने अरीब मजीदला जामीन मंजूर केला होता, मात्र, एनआयएने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान द्यायची इच्छा व्यक्त करून आदेश तूर्त स्थगित करण्याची विनंती केली होती.

वाचाः लॉकडाऊनचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिला इशारा

एनआयएच्या अपिलावर न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणी घेऊन ४ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय आज सुनावताना खंडपीठाने स्थगिती उठवली असून एनआयए विशेष कोर्टाचा जामिनाचा निर्णय योग्य असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

अरीब मजीदला जामीन देताना कोर्टानं घातल्या अटी

– पासपोर्ट तात्काळ एनआयएकडे जमा करायचा

– कल्याणमधील राहते घर सोडायचे नाही

– पहिले दोन महिने दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी पोलिस ठाण्यात हजेरी लावायची

– आंतरराष्ट्रीय फोन कॉल करायचे नाहीत

वाचाः शिर्डीचे साईमंदिर खुलेच राहणार, पण ‘या’ अटी कायम

कोण आहे अरीब मजीद?

इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला अरीब हा तीन मित्रांसह २३ मे २०१४ रोजी यात्रेकरूंच्या गटातून इराकमध्ये गेला होता. त्यानंतर तो ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेत सामील झाला, असा आरोप आहे. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी तो तुर्कस्तानहून मुंबईत परतताच त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कोठडीतच होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Asif Shaikh: माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल – police file fir against former mla asif shaikh for violate covid norms in malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी...

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

Recent Comments