Home शहरं औरंगाबाद bal tapaswi maharaj: नांदेडमध्ये बालतपस्वी महाराजांची हत्या; आरोपीला तेलंगणातून अटक - bal...

bal tapaswi maharaj: नांदेडमध्ये बालतपस्वी महाराजांची हत्या; आरोपीला तेलंगणातून अटक – bal tapaswi nirvan rudra pashupatinath maharaj murder, one arrested from telangana


नांदेड:नांदेड येथे मठात घुसून बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केल्याप्रकरणी अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी साईनाथ लिंगाडे या आरोपीला तेलंगणातून अटक केली आहे.

रात्री दीड वाजता बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केल्यानंतर साईनाथ लिंगाडे हा तेलंगणाला पळून गेला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो तेलंगणाच्या तानूर गावात लपून बसल्याची खबर मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ तानूर गावात जाऊन लिंगाडेला अटक केली असून त्याला धर्माबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.. नांदेडचे पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. आरोपीविरोधात ३५४चा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं मगर यांनी सांगितलं. दरम्यान, करोनामुळे सात वर्षाखालील शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात अनेक अडचणी येत आहेत. या आरोपींची करोना चाचणी करावी लागते. त्यांना क्वॉरंटाइन केल्यानंतर कोर्टात हजर करावे लागत असल्याचं मगर यांचं म्हणणं आहे. तर आरोपीने यापूर्वी गावात एका मुलीची छेड काढली होती. त्यामुळे त्याला अद्दल घडवली असती तर आज साधूची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती, असं आमदार राजेश पवार यांनी सांगितलं.

नांदेड हादरला; बालतपस्वी महाराजांसह दोघांची मठात घुसून हत्या

दरम्यान, नागठाणा बुद्रुक येथे आरोपीने रात्री (रविवारी) दीड वाजताच्या सुमारास बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या मठात शिरून त्यांच्याकडे असलेला ऐवज लुटला. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. तसेच महाराजांच्या वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला असलेले लोक जागे झाले. त्यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बालतपस्वी महाराजांची हत्या करणाऱ्या आरोपी लिंगाडेवर कठोर करावाई करण्यता यावी. तसेच या घटनेतील इतर आरोपींचा शोध घेण्यात यावा, अशी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विहिंपचे कार्यकर्ते कृष्णाजी देशमुख, शशिकांत पाटील डॉ.रविकुमार चटलावार आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

हे सरकार पोकळ पॅकेजची घोषणा करणारे नाही: उद्धव ठाकरेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments