Home आपलं जग करियर Balbharti: लॉकडाउन काळातही बालभारतीने छापली ३ कोटी पुस्तकं! - balbharti prints three...

Balbharti: लॉकडाउन काळातही बालभारतीने छापली ३ कोटी पुस्तकं! – balbharti prints three crore textbooks even during lockdown period


म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील विद्यार्थ्यांना वेळेत शालेय पुस्तके मिळावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, सुमारे साडेनऊ कोटी पुस्तके छापून तयार आहे. पुस्तकनिर्मिती प्रक्रियेशी जुळलेल्या प्रत्येकाने करोनाच्या प्रादुर्भावातही आपले काम चोख पद्धतीने बजावल्याचा हा परिणाम असून, साडेनऊ कोटी पुस्तकांपैकी तीन कोटी पुस्तके लॉकडाउनमध्ये छापण्यात आल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्स अॅप ग्रुप, गुगल मीट, वर्क फॉर्म होम आणि ऑनलाइन काम अशा नव्या पद्धतींचा अवलंब केल्याने, हे शक्य झाल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्च महिन्यात बालभारतीची पहिली ते बारावीच्या ९ कोटी ५६ लाख पुस्तकांपैकी साधारण ३ कोटी पुस्तके छापून यायची होती. लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद होते. या परिस्थितीतही बालभारतीचे कर्मचारी, बालभारतीचे संचालक विवेक गोसावी, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप आणि शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी संघभावनेने काम केल्याने विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके मिळत आहेत. त्यामुळे बालभारतीच्या कार्याचे कौतुक होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहिले पाहिजे : CM

याबाबत गोसावी म्हणाले, ‘यंदा बारावीचा अभ्यासक्रम नवा असल्याने, अभ्यासक्रम तयार होऊन पुस्तकांची वेळेत प्रिंटिंग होणे गरजेचे होते. त्यामुळे विविध विषयांच्या अभ्यासगटांचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले. त्यानंतर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बैठका, चर्चा, विचारविनिमय या ग्रुपद्वारे करण्यात आले. ग्रुप प्रॉडक्शन टीम, प्रिंटिंग टीम यांचेही ग्रुप केले. राज्यातील नऊ डेपोंशी ऑनलाइनच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवला होता.’

बारावी मराठीसाठी शिक्षकांनी बनवले अॅप

‘अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर, ते प्रिंटिंग टीमकडे क्लाउडवर पाठवण्यात आले. काही लोकांकडे आवश्यक परवानगी घेऊन सीडीमार्फत प्रत्यक्ष पोहोचवण्यात आले. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यावर सरकारी परवानगी घेऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुस्तकांच्या प्रिंटिंगसोबतच डेपोतून पुस्तके रवाना करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया सरकारच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतींचा वापर करून केली,’ असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न : सहृदय आणि कणखर – pragati bankhele article on new zealand prime minister jacinda ardern

प्रगती बाणखेलेYou can carve your own path, be your own kind of leader.We do need to create a new generation of leadership.नव्या पिढीतलं...

Recent Comments