Home देश ban chinese citizen: हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश नाही! - chinese...

ban chinese citizen: हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश नाही! – chinese nationals not allowed: delhi hotel body joins boycott calls


नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात (Galvan Valley Violence) २० भारतीय जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर भारत चीन दरम्यान मोठा तणाव (India China Tension) निर्माण झालाय. यानंतर देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार (Boycott Chinese Product) करण्याची मागणी होतेय. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’कडून (CAIT) चिनी वस्तुंच्या बहिष्काराचं समर्थन करण्यात आलंय. सोबतच या संघटनेकडून दिल्लीतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना बंदी (Ban Chinese Citizen) घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

वाचा :गणेशमूर्तीही चीनमधून आयात करण्याची गरज काय?, अर्थमंत्र्यांचा सवाल
वाचा :अंतराळ मोहिमांत खासगी क्षेत्राला परवानगी, इस्रोची घोषणा

गुरुवारी दिल्लीतील बजेट हॉटेल्सच्या संघटना असलेल्या ‘दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशन’नं (धुर्वा) या निर्णयाची घोषणा केलीय. चीनच्या अरेरावीपणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कॅटनं म्हटलंय. यामुळे दिल्लीतील जवळपास ३००० बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये यापुढे चिनी नागरिकांना राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. या हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे जवळपास ७५ हजार रुम्स आहेत.

चीन भारतासोबत ज्या पद्धतीनं व्यवहार करत आहे आणि ज्या पद्धतीनं सीमेवर भारतीय सैनिकांची चिनी सैनिकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली, त्यानंतर दिल्लीच्या सर्व हॉटेल व्यावसायिकांच्या मनात चीनबद्दल मोठा राग आहे, असं ‘दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष महेंद्र गुप्ता यांनी म्हटलंय.

वाचा :चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय?
वाचा :गलवान: चीनच्या कुरापती सुरू; वादग्रस्त ठिकाणी पुन्हा उभारले तंबू

कॅटनंही हॉटेल असोसिएशनच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. कॅटकडून आता या मोहिमेत शेतकरी, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक आणि उपभोक्त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ‘भारतीय सामान, हमारा अभिमान’ या मोहिमेंतर्गत चीनी वस्तुंच्या बहिष्काराचं हे अभियान संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार आहे. ‘कॅट’च्या म्हणण्यानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत चीनकडून आयात करण्यात येणाऱ्या मालामध्ये एक लाख कोटी रुपयांपर्यंत घट करण्यात येणार आहे. हेच एक लाख कोटी रुपये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवले जातील, असाही मानस त्यांनी बोलून दाखवला.

वाचा :भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे
वाचा :राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोपSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments