Home शहरं मुंबई ban on tiktok: ban on tiktok : टिकटॉकने पीएम केअरला ३० कोटी...

ban on tiktok: ban on tiktok : टिकटॉकने पीएम केअरला ३० कोटी दिले; हा क्रांतीचा भाग होता का?: काँग्रेस – congress spokesperson sachin sawant ask bjp five question on chinese app


मुंबई: केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर हा क्रांतिकारक निर्णय असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी व्यक्त केली असून त्यावरून काँग्रेसने भाजपला घेरले आहे. टिकटॉकने पीएम केअर फंडाला ३० कोटी रुपये दिले हा क्रांतीचा भाग होता का? असा खोचक सवाल काँग्रेसने केला आहे. तसेच या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला ५ सवालही केले आहेत.

काँग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ५ प्रश्न विचारले आहेत. सहा वर्षे देश सुरक्षित हाती होता का? देशात डिजिटल असुरक्षा होती का? , टिकटॉकने ३० कोटी रुपये पीएम केअर फंडला दिले, हा क्रांतीचाच भाग होता का? माय गव्हर्नमेंट इंडिया ही साइट २० दिवसांपूर्वी टिकटॉकवर आणली गेली. त्यावेळीही डिजिटल सुरक्षा होती का? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पेटीएमचे काय झाले? असे सवाल सावंत यांनी केले आहे. मॅपात केलं पॅप, बंद करून चायनीज अॅप, अशी कोटी करत त्यांनी भाजपला टोलाही लगावला आहे.

मोदी सरकारने चिनी अॅप बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यावर सावंत यांनी हे सवाल केले आहेत. देश आता सुरक्षित हातांमध्ये आहे आणि भारताची डिजिटल सुरक्षा आता कोणीही ओलांडू शकत नाही. या क्रांतिकारक निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मनपूर्वक आभार, असं पाटील म्हणाले होते. चीनविरुद्ध भारताने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात टिकटॉकसह एकूण ५९ चिनी मोबाईल ॲपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीनने आपल्या तरुणांची दिशाभूल करण्यासाठी निर्माण केलेला घृणास्पद डाव आता यशस्वी होणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलं होतं.

फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट नमो अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. १३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आली आहे म्हणून सरकारने ५९ चिनी मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ही मागणी करताना बॅन नमो अॅप हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यामुळे खासगी माहितीच्या निकषावर चिनी अॅप बंद करणारे मोदी सरकार त्याच आधारे नमो अॅपवरही बंदी घालणार का? याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. काँग्रेसच्या या आरोपाला भाजप काय उत्तर देणार? याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

namo app : ‘नमो अॅप’वरही बंदी आणा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली मोठी मागणीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona test of air passengers: विमानात चढण्याआधी होणार करोना चाचणी – air passengers able to corona test before boarding the plane for going out...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानात चढण्याआधीच करोना चाचणी करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा उभी...

लाल सोने नजरकैदेत!

टीम मटा केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन व किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टनाची मर्यादा ठरवून दिल्याने व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे...

Recent Comments