Home देश पैसा पैसा bank npa will rise : बँंकांवर संकट: थकीत कर्जे वाढणार - npa...

bank npa will rise : बँंकांवर संकट: थकीत कर्जे वाढणार – npa of bank will going to increased


वृत्तसंस्था, मुंबई : रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये केंद्र सरकारसह बँका आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनाही झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने खासगी आणि सरकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या लाभांशांवर सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भांडवली पर्याप्तता निधी (सीएआर) राखण्यास मदत होणार असून, दुसरीकडे सरकारला मिळणाऱ्या रकमेवरही निर्बंध येणार आहेत. बँकांची थकीत कर्जे वाढण्याची (एनपीए) शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाचे संकट : गुंतवणूक करण्याआधी हे वाचा !

सप्टेंबरपर्यंत वाढणार थकीत कर्जे?

कोविड-१९ मुळे सर्वच बँकांच्या थकीत कर्जांमध्ये (एनपीए) सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच बँकांच्या भांडवली पर्याप्तता निधीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने खबरदारी म्हणून आधीच पावले उचलली आहेत; जेणेकरून या समस्येशी लढता येईल. एवढेच नव्हे तर लाभांशावर दोनदा करही आकारण्यात येणार आहे. जेव्हा बँका कमाई करतात तेव्हा त्यांना सरकारला लाभांश द्यावा लागतो. त्यावरही कर भरावा लागतो.

संधीसाधूपणाला लगाम; भारताचा चीनला मोठा दणका

लाभांश देण्याचा कालावधी वाढणार?

आयडीबीआय बँकेचे माजी कार्यकारी संचालक आर. रे. बन्सल यांच्या मते रिझर्व्ह बँकेने उचललेले हे चांगले पाऊल आहे. त्यामुळे भांडवली पर्याप्तता निधी राखण्यास मदत तर होईलच आणि शिवाय बँकांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी मदतही होईल. त्यांच्या मते हा निर्णय सप्टेंबरपर्यंत असून, जर स्थिती सुधारली नाही तर त्याचा कालावधी पुढेही वाढवला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत

लाभांशांचे प्रमाण कमी

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बँका अतिशय कमी लाभांश देत आहेत. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या नफ्यात होणारी घट आणि वाढती थकीत कर्जे हे होय. त्यामुळे या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नसला तरी, बँकांकडे काही प्रमाणात रक्कम राहण्याची शक्यता आहे. २०१२-१३ ते २०१५-१७ पर्यंत बँकांनी सरकारला चांगला लाभांश दिला. बँका आपल्या वार्षिक लाभाच्या जवळपास २० टक्के रक्कम केंद्राला लाभांशाच्या स्वरूपात देतात. मात्र, आता ही रक्कम कमी होण्याची शक्यता आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

Recent Comments