Home देश पैसा पैसा Banking Rules To Be Change From 1st July 2020 - डेडलाइन संपली...

Banking Rules To Be Change From 1st July 2020 – डेडलाइन संपली ; उद्यापासून बँकिंग क्षेत्रात होणार ‘हे’ बदल


करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बँकिंग सेवेतील काही अटी आणि शर्ती तीन महिन्यांसाठी शिथिल केल्या होत्या. त्याची मुदत आज ३० जून रोजी संपणार आहे. १ जुलैपासून ग्राहकांना एटीएमचा अतिरिक्त वापर, खात्यात किमान शिल्लक नसल्यास भुर्दंड सहन करावा लागणार आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर अर्थ खात्याने एटीएम वापराचे शुल्क तीन महिन्यांसाठी रद्द केले होते. ग्राहकांना एप्रिल ,मे आणि जून असे तीन महिने कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची मुभा होती. यावर कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या होत्या. ३० जूनपर्यंत ही सुविधा होती. मात्र उद्यापासून या सुविधा बंद होणार आहेत.

बचत खात्यात किमान शिल्लक ठेवा

१ जुलैपासून तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. १ जुलैपासून सेव्हींग अकाउंटमध्ये दरमहा किमान शिल्लक किंवा तीन महिन्यांची किमान सरासरी शिल्लक ठेवावी लागणार आहे. सार्वजनिक आणि खासगी बँकांची किमान शिल्लक अट शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी आहे. ग्राहकांनी याबाबत माहिती घेऊन किमान शिल्लक ठेवल्यास दंड टाळता येईल. ‘SBI’ ने यापूर्वीच घोषणा केली आहे.

‘एटीएम’चा अति वापर महागात पडणार

maharashtra times

उद्यापासून म्हणजेच १ जुलैपासून ग्राहकांनी एका मर्यादेपलीकडे एटीएमचा वापर केला तर त्यांना सेवा शुल्काचा भूर्दंड सहन करावा लागेल. काही बँकांमध्ये दर महिन्याला ३ ते ५ एटीएम व्यवहार निशुल्क आहेत. तर इतर बँकांसाठी २ किंवा ३ व्यवहार निशुल्क आहेत. त्यानंतर ग्राहकाला प्रत्येकवेळी पैसे काढताना ८ ते २० रुपये इतके एटीएम सेवा शुल्क भरावे लागेल. रक्कम किती काढणार त्यानुसारही शुल्क आकारले जाते.

‘PF’मधून पैसे काढण्याची सुविधा बंद

maharashtra times

करोना संकटात कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निर्वाह निधी खात्यातून (PF) काढण्याची परवानगी दिली होती. मात्र ही सुविधा बुधवार १ जुलैपासून बंद होणार आहे. यापुढे पीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यात भविष्य निर्वाह निधीमधून (ईपीएफओ) ११५४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आले होते. ३६ लाख पीएफचे दावे निकाली काढले.

घर बसल्या नवी कंपनी सुरु करता येणार

maharashtra times

१ जुलैपासून घर बसल्या नवीन कंपनी सुरु करता येणार आहे. केंद्राने कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली असून त्यात स्व-घोषणापत्रसुद्धा समाविष्ट केले आहे. त्यामुळे घरीच ही प्रक्रिया करता येईल. यात विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने १ जून रोजी या क्षेत्रातील गुंतवणूक आणि ‘MSME’ची नवीन व्याख्या जाहीर केली होती. १ जुलैपासून ती लागू होईल. मंत्रालयाच्या पोर्टल माहिती उपलब्ध आहे.

‘सबका विश्वास’ योजनेत आज शेवटची संधी

maharashtra times

सेवा कर आणि उत्पादन शुल्काशी संबंधित प्रलंबित कर तंटे सामोपचाराने सोडवण्यासाठी करदात्यांकडे आजची शेवटची संधी आहे. कारण केंद्र सरकारच्या ‘सबका विश्वास’ योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेची मुदत आज संपत आहे. करदात्यांना १ जुलैपासून या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्यांचे कर विषयक दावे प्रलंबित आहेत त्यांना ३० जूनपर्यंत या योजनेत तडजोडीने दावे निकाली काढता येतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments