Home महाराष्ट्र baramati crime: Baramati: तीन दिवसात प्रकरण मिटवा!; अजित पवारांच्या नावाने बारामतीतून 'त्याने'...

baramati crime: Baramati: तीन दिवसात प्रकरण मिटवा!; अजित पवारांच्या नावाने बारामतीतून ‘त्याने’ भरला दम – man arrested for claiming ajit pawar’s personal secretary


बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करत खासगी सचिव असल्याचे भासवत तोतयेगिरी करणाऱ्या तुषार चिंतामणी तावरे (रा. तारांगण सोसायटी, बारामती) याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. यासंबंधीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. या प्रकरणी अजय कामदार यांनी बारामती शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांना त्याने प्रकरण मिटवून घ्या, अन्यथा कडक कारवाई होईल, अशी दमबाजी केली होती. ( Baramati Crime Latest Updates )

वाचा: ‘विवेक ओबेरॉय भाजपच्या गोटातला; कुठले धागे कुठे पोहोचतील याचा भरोसा नाही’

कामदार यांना तावरे याने फोन करत तुमच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार आली आहे. मी ती तुम्हाला व्हॉटसअॅप केली आहे, असे सांगितले. कामदार यांनी ती तक्रार पाहिली असता त्यांच्या बांधकाम व्यवसायासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या नावे तक्रार केल्याचे दिसून आले. त्यावर तात्काळ कारवाई करावी असा आदेश देत ‘पोलीस उपायुक्त झोन ९ मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त झोन ९ मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एन. नगर पोलीस ठाणे, मुंबई यांच्या नावे रिमार्क मारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही करण्यात आली होती. कामदार यांनी घाबरून जात तावरे यांच्याशी संपर्क केला. त्यावर त्याने तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या, अन्यथा तुमच्या विरोधात कडक कारवाई होईल, असे सांगितले. रिमार्क उपमुख्यमंत्र्यांचाच आहे का, अशी विचारणा केली असता त्याने हो असे उत्तर दिले.

वाचा: कंगनाविरुद्ध मुंबईत राजद्रोहाचा गुन्हा दाखल; ट्वीटरवरील ‘ती’ भाषा भोवणार

कामदार यांना शंका आल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला असता अशा नावाचा कोणीही व्यक्ती पवार यांच्याकडे काम करत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांची कामदार यांची भेट घेतली. मुसळे यांनी रिसतर पोलिस तक्रार करा, असा सल्ला दिला. त्यानुसार तावरे विरोधात आलेल्या तक्रारीवरून तोतयेगिरी केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला व तावरेला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी कोणी साथीदार आहेत का, गुन्ह्याचा उद्देश काय होता, आरोपीने अजून असे काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले.

…तर येथे संपर्क करा

बारामती व परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक अथवा खासगी सचिव, त्यांच्या कार्यालयातून बोलतो आहे, असे सांगून तोतयेगिरी झालेली असल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.

वाचा: खलनायकांची खबर घ्यावीच लागेल!; बॉलीवूडबाबत गृहमंत्र्यांचे मोठे विधानSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mid Range Smartphone: मिड-रेंज स्मार्टफोन्सवर ५ हजारांपर्यंत सूट, अॅमेझॉन सेलमध्ये बेस्ट डील – amazon great indian sale offer: best deals on vivo y30 to...

नवी दिल्लीः अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये टॉप कंपन्यांच्या बेस्ट स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील आणि डिस्काउंट सोबत मिळत आहे. सध्या मिड रेंजच्या स्मार्टफोनची डिमांड खूप...

रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला चिरडले ट्रकने

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीवरील दाम्पत्य ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच पडल्याची घटना घटना जेलरोडच्या सिंधी कॉलनीसमोर बुधवारी सकाळी अकराला...

Recent Comments