Home शहरं पुणे barber attempts suicide: पुणे: लॉकडाउनमुळं सलून बंद, नाव्ह्यानं केला आत्महत्येचा प्रयत्न -...

barber attempts suicide: पुणे: लॉकडाउनमुळं सलून बंद, नाव्ह्यानं केला आत्महत्येचा प्रयत्न – barber attempts suicide facing financial crunch amid lockdown in pune


पुणे: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील सलून बंद आहेत. हाताला काम आणि पैसे मिळत नसल्यानं नैराश्येतून पुण्यातील एका नाव्ह्यानं सलूनमधीलच कैचीनं स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झाल्यामुळं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील सलून बंद आहेत. त्यामुळं सलूनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. पुण्यातील सलूनचा मालक जयराम गायकवाड यालाही आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळं नैराश्येतून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सलूनमधील कैचीनं स्वतःच्या पोटावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गोळ्या घालू, सोशल मीडियावरून धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम हा मंगळवारी घराबाहेर पडले आणि एका सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. जयराम गंभीर अवस्थेत स्वच्छतागृहात आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. मात्र, बराच वेळ होऊनही रुग्णवाहिका पोहोचली नाही. अखेर पोलिसांनी मोबाइल व्हॅनमधूनच त्याला रुग्णालयात नेले. पुण्यात लॉकडाउनमुळं सलून बंद होते. त्यामुळं आर्थिक अडचणीमुळं जयराम बऱ्याच दिवसांपासून तणावात होता. कुठूनही मदत मिळत नव्हती. त्यामुळं त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

३ वर्षांपूर्वी पालिका निवडणूक लढवली होती; उद्योजकाची गोळ्या झाडून हत्या

रोज अश्लिल चाळे करायचा; वैतागलेल्या बहिणीनं केली भावाची हत्या



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sarsenapati hambirrao movie: ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला ‘हा’ योगायोग – heavy rain interrupted the shooting once again said actor director pravin tarde

मुंबई टाइम्स टीमअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटासाठी भव्य...

mumbai: मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचं डॉक्टरने घेतलं चुंबन – mumbai 78 year old doctor arrested for touching woman patient inappropriately in clinic

मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली ७८ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली. रुग्ण महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टरने तिचे चुंबन...

Rahul Gandhi Vs Narendra Modi: बिहार: मोदींचे भाषण तुम्हाला कसे वाटले?; राहुल गांधींनी भरसभेत विचारला प्रश्न – Bihar Election 2020 Rahul Gandhi Criticizes Pm...

पाटणा: बिहारच्या निवडणुकीच्या (Bihar Election 2o2o) रणभूमीत काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची एंट्री झाली आहे. शुक्रवारी नवादामधील हिसुआ (hisua nawada...

संध्याकाळ ठरतेय घातवेळ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई सायंकाळी ६ वाजल्यानंतर रस्तेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण कामावरून घरी परतण्याच्या वेळेत, म्हणजेच सायंकाळी ६...

Recent Comments