Home मनोरंजन Basu Chatterjee Death: प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं निधन

Basu Chatterjee Death: प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं निधन


मुंबई- सिनेसृष्टीसाठी २०२० वर्ष हे परीक्षा पाहणारच आहे. एका धक्क्यातून सावरत नाहीत तोवर दुसरा धक्का बसत आहेत. आज गुरुवारी सकाळी हलक्या फुलक्या प्रेमपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या बासू चॅटर्जी यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते अनेक वर्ष मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजारामुळे त्रस्त होते. सिनेसृष्टीत त्यांना ‘बासू दा’ नावाने ओळखले जायचे.

आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. बासू चॅटर्जी यांनी छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला आणि चमेली की शादी अशा सिनेमांचं दिग्दर्शनक केलं. दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अशोक पंडितांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘मला सांगताना अत्यंत दुःख होतंय की महान दिग्दर्शनक बासू चॅटर्जी यांचं निधन झालं. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे. आम्हाला तुमची नेहमीच आठवण येईल.’

५० हून अधिक हिंदी आणि बंगाली सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या बासू यांनी रजनी आणि व्योमकेश बक्षी या मालिकांचंही दिग्दर्शन केलं. ७० च्या दशकात हृषीकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्यात सर्वोत्तम सिनेमे कोण तयार करतं याची निकोप स्पर्धा असायची. त्यांच्यातील या स्पर्धेमुळे प्रेक्षकांना फार चांगले सिनेमे पाहायला मिळाले.

३० जानेवारी १९३० रोजी अजमेर येथे त्यांच्या जन्म झाला. ते असे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी कलकत्याचू छाप स्वतःवर न पाडू देता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चमेली की शाकी आणि खट्टा मीठा हे सिनेमे त्याचंच एक उदाहरण आहे. मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रेम कथा साकारणं आणि फुलवणं यात बासु यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हते.

बासू चॅटर्जी यांच्या आकस्मित जाण्याने बॉलिवूडकरांना धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

land acquisition cases: भूसंपादन प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी – mns corporater salim shaikh demand for inquiry into land acquisition cases

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीने प्राधान्यक्रम ठरवून मंजूर केलेल्या भूसंपादन प्रकरणांवर मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या...

Recent Comments