Home क्रीडा bcci: भारताला करोनाचा मोठा धक्का, श्रीलंकेपाठोपाठ 'या' देशाचा दौराही रद्द - after...

bcci: भारताला करोनाचा मोठा धक्का, श्रीलंकेपाठोपाठ ‘या’ देशाचा दौराही रद्द – after sri lanka, bcci calls off zimbabwe tour due to corona virus


करोना व्हाटरसचा मोठा झटका आता भारताला बसला आहे. कारण बीसीसीआयला दोन दिवसांमध्ये आपले दोन दौरे रद्द करण्याची वेळ आली आहे. काल बीसीसीआयने श्रीलंकेचा दौरा रद्द केला होता. आज पुन्हा एका देशाचा दौरा बीसीसीआयने रद्द केला आहे.

करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना अजूनही सराव करण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू सध्या घरीच आहेत. जर सुरक्षेचा उपाय म्हणून बीसीसीआय खेळाडूंना सरावासाठी मैदानात पाठवत नसेल तर या परिस्थित परदेश दौरे कसे करता येतील, असा विचार बीसीसीआयने केला असावा.

काल श्रीलंकेचा दौरा रद्द केला होता…

भारतीय संघ श्रीलंकेमध्ये जाऊन तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळात चर्चा झाली होती. या दोन्ही मालिका जून-जुलै महिन्यांत खेळवण्यात येणार होत्या. सरकारच्या परवानगीनंतर या दोन्ही मालिका कधी खेळवायच्या, हे ठरवण्यात येणार होते. पण बीसीसीआयने हा दौराच रद्द करण्याचे काल ठरवले होते.

शुक्रवारी पुन्हा एकदा बीसीसीआयने झिम्बाव्बेचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर ऑगस्ट महिन्यात जाणार होता. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता. पण हा दौरा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, ” करोना व्हायरसमुळे भारतीय संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. भारतीय संघ २४ जूनपासून श्रीलंकेमध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडे सामने खेळणार होता. त्यानंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेमध्ये जाऊन तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार होता. पण करोना व्हायरसमुळे हे दौरे नियोजित वेळेनुसार होऊ शकणार नाहीत.”

जर श्रीलंकेचा दौरा रद्द केला जात असेल तर तिथे आयपीएल खेळवायचे की नाही, याचा विचारही बीसीसीआयला करावा लागणार आहे. दुसरीकडे दौरा रद्द केल्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ मागू शकते. दौरा रद्द होत असेल तर आयपीएल आमच्याकडेच खेळवा, अशी अटही श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयपुढे ठेवू शकते. त्यामुळे हा दौरा रद्द करण्याचे काही परीणाम बीसीसीआयला भोगावे लागणार का, हे पाहावे लागेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments