Home शहरं मुंबई Beach shacks: सागरी किनाऱ्यांवर आता ‘बीच शॅक्स’ - beach shakes on beaches

Beach shacks: सागरी किनाऱ्यांवर आता ‘बीच शॅक्स’ – beach shakes on beaches


‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ अर्थात चौपाटी कुटी उभारण्यासंदर्भातील धोरणास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असलेल्या या कुट्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड येथील समुद्र किनाऱ्यांवर उभारल्या जातील.

सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.

चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत. या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरू ठेवता येईल. तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.

कुटी उभारण्यासाठी…

– एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील.

– त्या उभारण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल.

– यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील.

– या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.

– त्यांचा आकार १५ फूट लांबी, १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल.

– गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल.

– कुटी मिळणाऱ्या व्यक्तीला परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.

– या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.

– याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

Recent Comments