Home शहरं मुंबई beaten by police: २५ दिवसांपासून मृतदेह शवागारात! - bodies in mortuary for...

beaten by police: २५ दिवसांपासून मृतदेह शवागारात! – bodies in mortuary for 25 days!


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘काही तरुणांच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चेंबूर पोलिस ठाण्यात त्याविषयी तक्रार करूनही पोलिसांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे’, असा आरोप करत मुलाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे. परिणामी वडिलांचा मृतदेह मागील २५ दिवसांपासून रुग्णालयाच्या शवागारातच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही हे संवेदनशील प्रकरण लक्षात घेऊन मृतदेहाची दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्यासाठी याचिकादारांनी अर्ज केल्यास त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून लवकर निर्णय होण्यासाठी राज्य प्रशासनाने सहकार्य करावे, असे निर्देश दिले आहेत.

राजेश गवाले यांनी याप्रश्नी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे वडील बाळू गवाले यांचा मृतदेह सध्या राजावाडी रुग्णालयात आहे.

‘१ जूनच्या रात्री घराजवळच्या भरणी मैदानात क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यानंतर नीलेश राणे व त्याच्या मित्रांनी मला जबर मारहाण करून डोक्यात दगड मारल्याने मी रक्तबंबाळ झालो. तेव्हा बचावासाठी आलेल्या माझ्या वडिलांनाही त्यांनी मारहाण केल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यात विलंब केला आणि नंतर माझ्या जबाबाची प्रत हरवल्याचे सांगून मला बोलावून घेत पुन्हा जबाब नोंदवला. मात्र, त्यात अनेक गोष्टी वगळल्याचे आणि आरोपींविरोधात आवश्यक कलमे लावली नसल्याचे नंतर लक्षात आले. आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याने मृतदेहाची पुन्हा शवचिकित्सा करण्याचे आणि तपास अन्य यंत्रणेकडे देण्याचे निर्देश द्यावेत’, अशा विनंतीची तातडीची याचिका राजेश यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. प्रशांत पांडे यांच्यामार्फत केली होती. ‘वडिलांचा मृतदेह देण्यास विलंब केला जात असल्याने करोना मृत्यू दाखवला जाण्याचा संशय आहे’, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, ‘मृत्यू रुग्णालयात झाल्याने करोना चाचणी करणे भाग पडले आणि त्यामुळे मृतदेह देण्यास विलंब झाला. नंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मृतदेह सोपवण्याची तयारी असूनही कुटुंबीयांनी तो स्वीकारलेला नाही. शवचिकित्सा अहवालाच्या आधारे आरोपींविरोधात आवश्यक कलमे लावली जातील’, असे म्हणणे पोलिसांनी मांडल्यानंतर उच्च न्यायालयाने राजेश यांचा तातडीचा अर्ज निकाली काढला. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तातडीने अपिल केले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उदय लळित व न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठाने याविषयी सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र, त्याचवेळी मृतदेहाची दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याच्या विनंतीविषयी उच्च न्यायालयात २६ जूनपर्यंत नवा अर्ज करण्याची मुभा राजेश यांना दिली. तसेच हा अर्ज लवकर निकाली निघावा यासाठी सरकारी प्रशासनाने सहकार्य करावे, असे निर्देशही २३ जून रोजी दिले.

उच्च न्यायालयात नवा अर्ज

त्यानंतर राजेश यांनी उच्च न्यायालयात नवा अर्ज केला असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments