Home शहरं जळगाव beautician corona positive: Coronavirus ब्युटिशियन करोना पॉझिटिव्ह; 'त्या' लग्नाचा मेकअपच उतरला! -...

beautician corona positive: Coronavirus ब्युटिशियन करोना पॉझिटिव्ह; ‘त्या’ लग्नाचा मेकअपच उतरला! – beautician who came for bridal makeup tested positive for covid 19


धुळे:नंदुरबार जिल्हयातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे नववधूच्या मेकअपसाठी आलेली ब्युटिशियन करोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या विसरवाडीतील वधु-वरांसह २९ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील वधू-वरासह दोन जणांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन तर उर्वरित २५ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. दरम्यान यानंतर विसरवाडी ग्रामपंचायतीने विवाह सोहळा झालेल्या परिसरात जंतुनाशक फवारणी केली असून आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. ( Beautician Corona Positive )

वाचा: मृतदेहाला आंघोळ, दफनविधीला गर्दी आणि पुढे काय घडलं

जळगाव जिल्हयात चोपडा तालुक्यातील अडावद येथील वधू लग्नासाठी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आली होती. वीस वऱ्हाडी मंडळींसह वधूचा मेकअप करण्यासाठी ब्युटिशियन चोपडा येथून विसरवाडीला आली होती. ती दि. २५ जून रोजी विसरवाडी येथे वधूसोबत एक दिवस राहिली. मात्र काही दिवसांपूर्वी भुसावळ येथील एका लग्नात नवरदेव करोना बाधित आढळला होता. या बाधित नवरदेवाच्या संपर्कातील ही ब्युटिशियन महिला होती. यामुळे तिला क्वारंटाईन करून नमुने तपासणीसाठी पाठविले असता दि. ३० जून रोजी ब्युटिशियन महिलेला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे लग्नात उपस्थित २९ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात पुजारी व आचारी यांचा देखील समावेश आहे.

वाचा: महापौरांनीच दिले करोना रुग्णांना योगाचे धडे

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याचवेळी मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक प्रकारचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात विवाह सोहळे पार पाडण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. विवाहाला केवळ ५० वऱ्हाडींची उपस्थिती असावी, अशी प्रमुख अट त्यात आहे. याशिवाय लग्नासाठी मंगल कार्यालयाचे दरवाजेही खुले करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुहूर्त साधून विवाह पार पाडले जात आहेत. मात्र, करोनाने तिथेही पाठ सोडली नसल्याचे नवापूरमधील विवाह सोहळ्यात घडलेल्या घटनेवरून दिसत आहे.

वाचा: लॉकडाऊनमध्ये रोजगार गेला; तरुणाचा गळफास, तर वृद्धाची रेल्वेखाली उडीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Sung Spiderman Song In The 4th And Final Test In Brisbane – IND vs AUS : रिषभ पंत मैदानात नेमकं कोणतं गाणं...

ब्रिस्बेन, IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्यात बरेच रंजक किस्से पाहायला मिळाले. यामध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत सामना सुरु असताना मैदानात गाणं...

jayant patil on uddhav thackeray driving: CM ठाकरेंच्या वाटेत अडथळे कोण आणतंय?; राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री म्हणाला… – chief minister uddhav thackerays car is running...

मुंबई: राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी...

Recent Comments