Home शहरं बीड beed suicide: ऑनलाइन क्लाससाठी टॅब दिला नाही; विद्यार्थ्यांनं केली आत्महत्या - beed...

beed suicide: ऑनलाइन क्लाससाठी टॅब दिला नाही; विद्यार्थ्यांनं केली आत्महत्या – beed suicide 17 year old boy hangs himself for tab for online class in gevrai


म. टा. प्रतिनिधी, बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे एका १७ वर्षीय युवकाने आपल्या आई-वडिलांकडे ऑनलाइन क्लाससाठी टॅब घेण्याची मागणी केली. मात्र पालकांनी टॅब घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी दुपारी ही घटना घडली.

गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील अभिषेक राजेंद्र संत याने दहावीची परीक्षा दिली होती. निकाल लागण्यासाठी काही कालावधी बाकी असताना इथून पुढचे शिक्षण आता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने आता आपल्याला मोबाइलची आवश्यकता असल्याने त्याने पालकांकडे टॅबची मागणी केली. सध्या पेरणीच्या कामाची लगबग असल्याने थोडे दिवस थांब, टॅब घेऊ. सध्या पेरणीचे दिवस आहेत. ते झाले की नवीन टॅब घेऊन देऊ, असे पालकांनी त्याला सांगितले. त्यानंतर सर्व जण शेतावर गेले. मात्र, नाराज झालेल्या अभिषेकने दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, सहायक फौजदार फड, बागर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी गेवराईतील उपजिल्हा रूग्णालयात पाठवले. सांयकाळी सहाच्या सुमारास पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशिरा भोजगाव येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मोठ्या भावाची केली हत्या, मृत्यूचा बनाव रचला पण…

जळगावात तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ; घातपाताची शक्यताSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments