Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Best apps: व्हिडीओची निर्मिती करताय?, मग अॅप्सची मदत घ्या - best apps...

Best apps: व्हिडीओची निर्मिती करताय?, मग अॅप्सची मदत घ्या – best apps for making videos


मुंबई टाइम्स टीम

सध्या बहुतांशी स्मार्टफोन्समध्ये मेगापिक्सेल कॅमेरा असतो. त्यामुळे एचडी क्वालिटी व्हिडीओ चित्रित करता येतो. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचे, तुमच्या मित्रमंडळीचे, आसपासच्या परिसराचे किंवा इतर व्हिडीओ बनवण्याची आवड असेल तर तुम्ही फार कमी गुंतवणुकीत हे व्हिडिओ तयार करू शकता. असे छोटे व्हिडिओज तयार करण्यासाठी आणि एडीट करण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स…

० हटके निर्मितीसाठी…

तुम्ही बनवलेल्या व्हिडीओला अधिकाधिक व्ह्यूज मिळावे यासाठी त्यात काहीतरी वेगळेपण दिसायला हवं. तुम्ही देत असलेल्या संदेशाला तसंच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं ते वेगळेपण असायला हवं. तुमचा कन्टेंट जर लोकांना हट के आणि खरा वाटला, त्यातील अस्सलपणा भावला तर लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील. व्हिडीओ बनवणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी आणि अधिकाधिक व्हिडीओजची निर्मिती होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं, यासाठी अनेक अॅप्स व्हिडीओ मेकर्सना पाठिंबा देत आहेत.

० दर्जेदार व्हिडीओजसाठी प्रोत्साहन

सध्या उपलब्ध असलेल्या लाखो व्हिडीओ अॅप्समध्ये कोणतं अॅप सर्वात चांगलं आहे, याची निवड करणं अवघड आहे. हल्ली छोटे-छोटे व्हिडीओज तयार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक अॅपवर माहितीपूर्ण आणि शैक्षणिक असे भरपूर व्हिडीओज पाहायला मिळतात. काही अॅप्सवर प्रत्येक व्हिडीओ बनवणाऱ्याला टॅलेंट क्रीएटर युनिटसोबत समान पातळीवर पाहिलं जातं. यामुळे त्यांना नवीन आणि उत्तम दर्जाचे व्हिडीओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तसंच अॅपसोबत संलग्न असलेल्या किंवा करार केलेल्यांना आर्थिक मोबदला मिळतो.

० दृष्टिकोन असावा वेगळा

प्रत्येक व्हिडीओला निश्चित असा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. उगाच प्रेक्षकांना दाखवायचं म्हणून काहीही कन्टेंट तयार करून चालणार नाही. उत्तम व्हिडीओ बनवण्यासाठी योग्य कॅमेरा अँगल असणं गरजेचं आहे. काही व्हिडीओजसाठी व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा दृष्टिकोन लागतो, तर काही व्हिडीओज तयार करताना तुम्हाला फ्रेममध्येसुद्धा यायची गरज भासत नाही. एकूणच विषयाला अनुसरून तुम्हाला व्हिडीओचं सादरीकरण ठरवावं लागतं. यासाठी तुम्ही विविध अॅपवर उपलब्ध असलेल्या फिल्टर्स आणि पर्यायांचा उपयोग करू शकता.

० आवाजही महत्त्वाचा

व्हिडीओच्या दर्जासोबतच त्याच्या आवाजाची गुणवत्तादेखील उत्तम असणं तितकंच महत्त्वाचं असतं. जर व्हिडीओत तुमचा आवाज अडकत असेल किंवा नीट ऐकू येत नसेल तर तुम्ही प्रेक्षक गमावता आणि मग तुमचे फॉलोवरदेखील हळूहळू कमी होऊ लागतात. सुदैवानं हल्ली स्मार्टफोनमधील मायक्रोफोन्स चांगले असतात. पण, तरीही तुम्हाला आवाज रेकॉर्ड करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही लेपल माइकचा वापर करावा. तुमच्याकडील दुसऱ्या फोनचा वापर करुनही रेकॉर्डिंग करू शकता.

० छोट्या व्हिडीओजपासून सुरुवात

जास्त कालावधीचे व्हिडीओज बनवणं हे तुमचं ध्येय असलं तरी याची सुरुवात छोटे व्हिडीओज बनवून केली तर तुम्हाला हे तंत्र समजणं सोपं जाईल. हीच संधी काही अॅप्स उपलब्ध करून देतात. यामुळे व्हिडीओग्राफी क्षेत्रात व्यासायिकरित्या पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला अॅप्सच्या माध्यमातून अनुभव मिळेल. काही अॅप्स प्रत्येकाला एक प्रकारचं व्यासपीठ खुलं करून देतं. ज्याच्यामार्फत तुम्ही वेगवेगळे स्पेशल इफेक्ट्स आणि स्टीकर्सचा वापर करून अनोखे, व्यवसायिक व्हिडीओज बनवू शकता. तसंच चांगला कन्टेंट आणि खूप फॉलोवर्स असलेल्या लोकांना शोधून भरपूर कल्पना व विचार तुमच्यापर्यंत पोहोचायला या अॅपमुळेच मदत होईल.

० फ्रेंडली अॅप्सची मदत

सध्याच्या डिजिटल युगात काही अॅप्समध्ये निअर बाय हा पर्याय असतो. या फिचरमुळे तुम्हाला आवडेल असा कन्टेंट शोधायला मदत होते. या फिचरमुळे तुमच्या आवडीचा कन्टेंट तयार करणाऱ्या तुमच्या आजूबाजूच्या युजर्सना शोधण्याचं काम सोपं होतं. काही अॅप्समध्ये नव्यानं अॅड करण्याच आलेले फिचर तुम्हाला व्हिडीओ कन्टेंटची निर्मिती करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवतं. या फिचरचा उपयोग करून तुम्ही अनेकांशी संवाद साधू शकता आणि तुमचं कौशल्य सादर करू शकता.

संकलन- प्राजक्ता हरदास, मुंबई विद्यापीठSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments