Home मनोरंजन bharti singh and harsh bharti singh: ड्रग्ज प्रकरण: भारती आणि हर्ष यांना...

bharti singh and harsh bharti singh: ड्रग्ज प्रकरण: भारती आणि हर्ष यांना मोठा झटका; न्यायालयीन कोठडीत रवानगी – court sends comedian bharti singh and her husband haarsh limbachiyaa to judicial custody for three day


मुंबई: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं अटक केल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया यांना अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यानंतर त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे.

भारती सिंग सध्या ड्रग्ज कनेक्शनमुळे चर्चेत आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) भारतीच्या घरावर छापा टाकला असता त्यांना तेथून गांजा मिळाल्यानं टीव्ही सृष्टीत खळबळ उडाली आहे.
कधी दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण, आज कोट्यवधींची मालकीण आहे भारती सिंग
१४ दिवसांची न्यायलयीन कोठडी
भारती आणि हर्ष या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून दोघांनीही जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.

उद्या सुनावणी
कोर्टानं दिेलेल्या निर्णयानंतर हर्ष आणि भारती यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले असून यावर उद्या म्हणजेच सोमवारी सुनावणी होणार आहे.

भारती आणि हर्ष दोघांनी देखील ड्रग्जचं सेवन करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
भारती आणि हर्षच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात हजर
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीनं सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरावर छापे टाकत धडक कारवाई केली आहे. ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीदरम्यान भारती आणि तिच्या पतीचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीनं त्यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात त्यांना भारतीच्या घरातून ८५.५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. यानंतर त्यानं एनसीबीनं समन्स बजावलं होतं. अनेक तास दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर दोघांनीही गांजाचं सेवन करत असल्याची कबुली दिली. यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

india tour of australia 2020: India vs Australia: पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाला सोडवाव्या लागणार ‘या’ दोन समस्या – india tour of australia 2020...

सिडनी : आता काही दिवसांवरच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवीसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण पहिल्या एकदिवीय सामन्यापूर्वी भारताच्या संघापुढे दोन महत्वाच्या समस्या...

tamil nadu strong winds blow in chennai: ​निवार चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू, ३ तासांत पुदुच्चेरीला धडकणार ​ – tamil nadu strong winds blow in...

चेन्नईः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'निवार' चक्रीवादळाची ( cyclone nivar ) लँडफॉल प्रक्रिया ( nivar expected landfall ) सुरू झाली आहे. चक्रीवादळ हे...

Nashik News : टपाल विभागाचे खासगीकरण नकोच – don’t reject the privatization of the postal department

म. टा. प्रतिनिधी, नाशिकखासगीकरणाच्या विरोधासह अन्य २१ मागण्यांसाठी टपाल युनियन शुक्रवारी (दि.२७) संपावर जाणार आहे. कामबंद ठेवण्यात येणार असल्याने तसेच शनिवारी व रविवारी...

Recent Comments