Home विदेश bhutan water issue: Bhutan भूतान सरकारने म्हटले ऑल इज वेल! 'या' कारणाने...

bhutan water issue: Bhutan भूतान सरकारने म्हटले ऑल इज वेल! ‘या’ कारणाने अडवले गेले पाणी – bhutan never stopped assam baksa farmers water said bhutan government


थिंफू: भारताच्या दिशेने येणारे पाणी भूतानने अडवले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर गोंधळ उडाला होता. मात्र, भूतानने सरकारने जाणिवपूर्वक पाणी अडवले नसल्याचे समोर आले आहे. चीन, नेपाळनंतर भूताननेदेखील भारताविरोधात पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू झाली होती. पाणी अडवल्यामुळे आसाममधील शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते. मात्र, आता परिस्थिती सामान्य असल्याचे भूतानने सांगितले आहे.

भारत आणि भूतान या दोन्ही देशांचे संबंध अधिक चांगले राहिले आहेत. मात्र, भूतानने मागील काही दिवसांमध्ये आसाममधील बक्सा जिल्ह्यात येणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. बक्सा जिल्ह्यातील २६ हून अधिक गावातील जवळपास सहा हजार शेतकरी सिंचनासाठी डोंग योजनेवर अवलंबून आहेत. स्थानिक शेतकरी आपल्या शेतीसाठी १९५३ पासून भूतानमधून येणाऱ्या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भूतानने पाणी अडवल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून सरकारकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली होती. आसाममधील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर भूतानने याचे स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा: भारत-चीन व्यापारातही तणाव; भारतीय माल चीनने अडवला!

वाचा: चीनचा भारताला धोका; युरोपातील अमेरिकेच्या फौजा आशियात: USA

भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारताच्या दिशेने जाणारे नदीचे पाणी अडवले असल्याचे वृत्त चुकीचे आहे. भूतानने असे कोणतेही आदेश दिले नव्हते. पाणी अडवल्याची बाब समोर आल्यानंतर या ठिकाणची पाहणी करण्यात आली. माती, दगडांमुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला होता. भूतानच्या नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी प्रवाह सुरळीत केला असून आसाममधील नागरिकांना पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबातचे निवदेन सोशल मीडियावर दिले असून काही छायाचित्रेही पोस्ट केले आहेत. भूतान सरकारने कोणतीही अडवणूक केली नसून काही नैसर्गिक कारणांमुळे पाणी अडवले गेले असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा: चीन, नेपाळनंतर आता भूतानने उचलले भारताविरोधी पाऊल!
आसामचे मुख्य सचिव संजय कृष्णा यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. काही नैसर्गिक कारणांमुळे पाण्याचा प्रवाह अडवला गेला होता. याबाबत भूतान सरकारला माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाही केली असल्याचे कृष्णा यांनी सांगितले. भूतानकडून येणारे पाणी अडवले गेल्यामुळे आसाम बक्सा जिल्ह्यातील २६ गावातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे भूतानकडून येणारे पाणी येत नसल्याचे समोर आले. या मुद्यावर केंद्र सरकारलाही टीका सहन करावी लागली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nagpur latest news update: Nagpur: डोळ्यादेखत मुलगा बुडाला; पालकांना बसला जबर मानसिक धक्का – nagpur 13 year old boy drowns in pench river

नागपूर: डोळ्यादेखत पोटच्या पोराने जग सोडावे यापेक्षा मोठे दु:ख कदाचित या जगात नसेल. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सहलीला गेलेल्या एका १३...

green tax: ​तुमच्याकडे ८ वर्षे जुनी गाडी आहे? भरावा लागू शकतो ‘हा’ मोठा कर – green tax will be imposed on old polluting vehicles

नवी दिल्लीः वाहतुकीशी संबंधित ८ वर्षांपेक्षा जुन्या सर्व वाहनांना ग्रीन टॅक्स ( green tax ) भरावा लागेल. हा रस्ते कर १०-२५ टक्के असू...

R Ashwin: ऑस्ट्रेलिया संघासोबत लिफ्टमध्ये प्रवेश दिला नाही; भारतीय गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा – r ashwin says we were not allowed to enter lift...

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याची घटना सर्वांना माहिती आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे...

Recent Comments