Home क्रीडा Bhuvneshwar Kumar: सचिनची विकेट घेतली आणि या दोघांचे नशीब बदलले! - after...

Bhuvneshwar Kumar: सचिनची विकेट घेतली आणि या दोघांचे नशीब बदलले! – after bow out sachin tendulkar these two indian bowlers career change


नवी दिल्ली: करिअरच्या एका टप्प्यावर अशी वेळ येते की गोलंदाज मोठ्या आणि दिग्गज फलंदाजांची विकेट घेतो. तो क्षण त्यांच्या गोलंदाजांच्या करिअरची दिशा बदलून देतो. पण काही गोलंदाज याला अपवाद ठरतात. करिअरची सुरूवात बिग शॉर्टने होते आणि त्यांना मोठी संधी मिळते. भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची विकेट घेण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाजाचे असायचे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सचिनची विकेट घेणे हे सामना जिंकण्याच्या आनंदापेक्षा मोठा असायचा. भारतीय क्रिकेटमध्ये असे दोन गोलंदाज आहेत ज्यांनी सचिनची विकेट घेतल्यानंतर त्यांच्या करिअरची दिशाच बदलली.

वाचा- फलंदाज ज्याने क्रिकेटला बदलून टाकले; पाक गोलंदाजांची पिसे काढली!

भारतीय संघाकडून खेळणारे दोन गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि पीयूष चावला हे दोघे उत्तर प्रदेश संघाकडून खेळायचे. भारतीय संघात संधी मिळण्याची भुवनेश्वरची शक्यता ५० टक्केच होती. तर पीयूष चावलाचा तर संधी मिळण्याची शक्यताच नव्हती. तो संघात स्थान मिळण्याच्या स्पर्धेतच नव्हता. पण या दोघांनी सचिनची विकेट घेतली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. भुवनेश्वरने सचिनची विकेट घेतली आणि त्याची संघात निवड होण्याची शक्यता ५० टक्क्यांवरून थेट ९० टक्क्यांवर गेली.

वाचा- गावस्करांनी असे का केले? उत्तर फक्त त्यांनाच माहीत!

माजी विकेटकिपर दीपदास गुप्ता यांच्याशी ऑनलाइन गप्पा मारता भुवनेश्वर म्हणाला, रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना सचिन तेंडुलकरला बाद करणे हा करिअरमधील टर्निंग पॉइट ठरला. सध्या भारतीय संघाचा मुख्य जलद गोलंदाज असलेल्या भुवनेश्वरने २००८-०९च्या रणजी सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मुंबई विरुद्ध खेळताना भुवनेश्वर फक्त १८ वर्षांचा होता. अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध त्याने ७८ धावात ५ विकेट घेतल्या. त्यात एक विकेट सचिनची होती. सचिनला दहा धावा ही करता आल्या नाहीत. सचिनच्या त्या एक विकेटने करिअरच बदलले.

वाचा- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम; स्वत:च्या देशाचे स्पेलिंग चुकीचे लिहले!

माझ्या करिअरमधील एक महत्त्वाची घटना होती. त्या मॅचच्या आदी मी पहिल्या सत्रात ३० ते ३५ विकेट घेतल्या होत्या. पण सचिन पाजीची विकेट घेतल्यानंतर लोकांनी माझ्या आधीच्या सत्रातील विकेटवर नजर टाकली. तेव्हा त्यांना लक्षात आले की मी गेल्या सत्रात चांगली कामगिरी केली आहे.

वाचा- सर्वाधिक चेंडू खेळलेले टॉप ५ फलंदाज; हा भारतीय अव्वल स्थानी!

भुवनेश्वर प्रमाणेच पीयूष चावला बाबत झाले. २००५ साली जेव्हा सचिनला टेनिस एल्बो झाला होता. तेव्हा मोठ्या काळावधीसाठी तो क्रिकेटपटून दूर होता. चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेतून त्याने पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली.१३ ऑक्टोबर रोजी मोहाली येथे झालेल्या या सामन्यात चावलाने गुगली चेंडूवर सचिनची बोल्ड घेतली. हा सामना ग्रेग चॅपल पाहत होते. सचिनची विकेट घेतल्यानंतर चावलाचे करिअरच बदलले. त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Ramdas Athawale Corona Positive: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना – Union Minister Ramdas Athawale Tests Covid Positive

मुंबईः अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे....

Recent Comments