Home देश Bihar thunderstorms: बिहारमध्ये विजांचे तांडव; ८३ जणांचा मृत्यू, तर यूपीत ९ ठार...

Bihar thunderstorms: बिहारमध्ये विजांचे तांडव; ८३ जणांचा मृत्यू, तर यूपीत ९ ठार – 83 die in bihar due to thunderstorms, cm announces rs 4 lakhs ex gratia


पाटणाः बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने वीज कोसळून राज्यात ८३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी ही झाले आहेत. उत्तर बिहारसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने आधीच दिला आहे. बिहारच्या २३ जिल्ह्यांमध्ये ही मानवी हानी झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातही वीज अंगावर कोसळल्याने ९ जण दगावले आहेत.

बिहारच्या गोपालगंजमध्ये सर्वाधिक १३ जणांचा वीज कोसळल्याने मृ्त्यू झाला आहे. अररिया आणि किशनगंज जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तर पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, गोपालगंज, सीवान, सारण, मधुबणी, मुजफ्फरपूर, दरभंगा, वैशाली, शिवहर, समस्तीपूर, सुपौल, पूर्णिया, सहरसा आणि मधेपुरा हे ऑरेंज झोनमध्ये आहेत, असं हवामान विभागाने म्हटलंय. या भागांममध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडला. वीज अंगावर कोसळल्याने गोपालगंजमध्ये १३, तर मधुबनी आणि नबादा मध्ये प्रत्येकी ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोप

बिहारच्या ८ जिल्ह्यांमध्ये कमीत कमी ५ नागरिकांना वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. गोपालगंज, पूर्व चंपारण, सीवान, बांका, दरभंगा, भागलपूरसह मधुबनी आणि नबादा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे

मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने बिहारमध्ये ७२ तासांचा अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये पुढच्या ७२ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आज हवामान विभागाने दिलाय. बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसंच दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे तेथील तापमान घसरले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आज काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.

करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना

उत्तर प्रदेशातही अनेकांचा मृत्यू

फक्त बिहारच नाही तर वीज कोसळून उत्तर प्रदेशात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देवरियामध्ये वीज कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला तर १० हून अधिक जण जखमी झाले. बाराबंकीमध्ये २ जणांचा मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments