Home देश bjp mla kesarisinh jesangbhai solanki: राज्यसभा निवडणूक : अॅम्ब्युलन्समधून आमदार थेट विधिमंडळात!...

bjp mla kesarisinh jesangbhai solanki: राज्यसभा निवडणूक : अॅम्ब्युलन्समधून आमदार थेट विधिमंडळात! – rajyasabha voting : bjp mla kesarisinh jesangbhai solanki arrives his matar legislative assembly in an ambulance


अहमदाबाद : देशातील आठ राज्यांच्या राज्यसभेच्या जागांसाठी १९ जागांवर शुक्रवारी मतदान सुरू आहे. गुजरातमध्ये चार जागांसाठी सुरू असलेल्या मतदानात चुरशीची लढाई दिसतेय. इथे भाजप आणि काँग्रेस आपल्या एका एका आमदाराच्या मतासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. आपलं एकही मत वाया जाता कामा नये, यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. याच दरम्यान, गुजरातच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार केसरसिंह जेसंगभाई सोलंकी चक्क अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी पोहचलेले दिसले.

याला म्हणताता एकनिष्ठता!

गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान सुरू आहे. भाजप आमदार केसर सिंह आजारी असल्यानं सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण मतदानासाठी मात्र ते अॅम्ब्युलन्समधून दाखल झाले. मतदानानंतर त्याच अॅम्ब्युलन्समधून ते पुन्हा रुग्णालयात पोहचले.

निवडणुकीवर करोनाचा प्रभाव

गुजरातमध्ये करोना संसर्गाच्या धोक्यामुळे राज्यसभा निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं कर्नाटकच्या चार आणि मिझोरमच्या तसंच अरुणाचलच्या एका-एका जागेसाठी निवडणुकीची घोषणा केली. राज्यसभेच्या १९ जागांमध्ये आंध्रप्रदेश आणि गुजरातहून प्रत्येकी चार, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी तीन, झारखंडच्या दोन तर मणिपूर, मिझोरम आणि मेघालयाच्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक पार पडतेय.

वाचा :दिल्लीचे आरोग्य मंत्री व्हेंटिलेटरवर, करोनाने न्युमोनिया वाढला
वाचा :बलरामाला ‘दारुडा’ म्हणणाऱ्या मोरारी बापूंवर भाजप नेत्याचा हल्ला
वाचा :rajya sabha election: देशातील ८ राज्यांमध्ये आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गुजरातची राजकीय परिस्थिती

गुजरातमध्ये काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भारतसिंह सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे, तर सत्ताधारी भाजपने अभय भारद्वाज, रमिलाबेन बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवलंय. चार जागांसाठी एकूण ५ उमेदवार नशीब आजमावत असल्याने गुजरातमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.

गुजरातमध्ये १८२ पैंकी १७२ आमदार मतदान करणार आहे. विजयासाठी ३५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपकडे १०३ तर काँग्रेसकडे ६६ आमदार आहेत. तिसरी जागा जिंकण्यासाठी भाजपला केवळ २ आमदारांची गरज आहे, तर काँग्रेसला दुसरी जागा जिंकण्यासाठी आणखी ४ आमदार हवे आहेत. तर न्यायालयीन खटल्यांमुळे विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत.

वाचा: मणिपूरमधील भाजप सरकार संकटात, चार मंत्र्यांचे राजीनामे
वाचा :९ आमदारांनी साथ सोडली; या राज्यात भाजप सरकार अडचणीत
वाचा :बिल भरायला पैसे नसल्यास रुग्णाला अडवलं जाऊ शकतं?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments