Home शहरं औरंगाबाद bjp mp bhagwat karad: भाजप खासदार कराड यांच्या मुलांची कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडिओ...

bjp mp bhagwat karad: भाजप खासदार कराड यांच्या मुलांची कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल – bjp mp bhagwat karad sons beaten up party worker in aurangabad


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त खासदार भागवत कराड यांच्या दोन मुलांसह एका कार्यकर्त्यानं बांधकाम ठेकेदार आणि भाजयुमोचे पदाधिकारी कुणाल मराठे यांना घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी खासदार कराड यांच्या दोन मुलांसह एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी, २३ मे रोजी रात्री १० वाजता कोटला कॉलनी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी मराठे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन भागवत कराड, वरुण भागवत कराड आणी पवन सोनवणे यांच्याविरोधात घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मराठे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात कराड यांच्या मुलांसह तिघे मराठे यांना मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबईतून तरुणाला अटक

या प्रकरणी कुणाल मराठे (वय २५, रा. कोटला कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. मराठे हे बांधकाम ठेकेदार म्हणून काम करत असून, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून पक्षाचे काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समतानगर भागात शनिवारी करोनाचे रुग्ण सापडल्याने त्यांनी वॉर्डात निर्जंतुकीकरणाचे काम केले. यानंतर कुणाल हे घरी रात्री दहा वाजता कुटुंबासहीत जेवण करीत बसले होते. यावेळी घराचा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनवणे हे तिघे मराठे यांच्या घरात घुसले. तू वॉर्डामध्ये फिरायचे नाहीस, कारण येत्या मनपा निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार असल्याने मी लोकांना मदत करत असतो, असे म्हणत तिघांनी तू लोकांना कोणतेही मदत कार्य करायचे नाही आणि कुठलेही काम करायचे नाही, असा दम भरला. त्यानंतर मराठे यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकीही दिली. मराठे यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मराठे हे घरातल्या खोलीत गेल्यानं थोडक्यात बचावले. या प्रकरणी कुणाल मराठे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन, वरुण कराड आणि पवन सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या तरुणाची शौचालयात आत्महत्या

दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आला आहे. २५ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये कुणाल मराठे यांना मारहाण होताना दिसत आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओच्या पुराव्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तर मध्यस्तीचा केला प्रयत्न: खासदार कराड

कोटला कॉलनी येथे गरजूंना किराणा किट वाटपाचे काम पवन सोनवणेसह अन्य कार्यकर्ते करत आहेत. माझा मुलगा हर्षवर्धनही त्यांच्यासोबत होता. वाटप सुरू असताना कुणाल मराठे यांच्या घरीही किट हवी का, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी केली. त्याचा राग येऊन कुणाल याने पवन यास अपशब्द वापरले. त्यातून वादावादी झाली. हा वाद सोडण्यासाठी माझा मुलगा हर्षवर्धन याने प्रयत्न केला, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

raksha khadse vs eknath khadse in raver: Raksha Khadse: एकनाथ खडसेंना आता सूनेचेच आव्हान; रक्षा खडसेंनी केला ‘हा’ निर्धार – raksha khadse challenges eknath...

जळगाव: माझ्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंका असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही व भाजपातच राहणार असल्याचे सांगत भाजप खासदार रक्षा खडसे...

Recent Comments