Home शहरं मुंबई bmc guidelines for salon: BMC Guidelines For Salon मुंबईत सलून, मंगल कार्यालयांसाठी...

bmc guidelines for salon: BMC Guidelines For Salon मुंबईत सलून, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली – bmc issues new guidelines for salon beauty parlour and wedding hall


मुंबई: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने सलून, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी सुधारित निर्देश बुधवारी जारी केले आहेत. ( BMC Guidelines For Salon and Wedding Hall )

सलून, ब्युटी पार्लरसाठी…

> केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर या ठिकाणी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. सर्व आस्थापनांमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था बंधनकारक असून वातानुकूलीन यंत्रणेने बंदिस्त ठिकाण नसावे.

> केस कापणे, केसांना कलप लावणे, वॅक्सींग, थ्रेडींग या कामालाच परवानगी असेल. तसेच त्वचेशी संबंधित कोणत्याही सेवेस परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दलची माहिती प्रवेशद्वारावर ठळकपणे लावणे बंधनकारक.

> कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रन, मास्क वापरणे बंधनकारक आहे. आवश्यक सेवा दिल्यानंतर खुर्ची निर्जंतुक करावी. तसेच दुकानातील फरशी, जमीन दर दोन तासांनी निर्जंतुक करणे बंधनकारक.

> प्रत्येक गिऱ्हाइकासाठी स्वतंत्र डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन, रुमाल वापरणे आवश्यक आहे. जी उपकरणे डिस्पोजेबल नाहीत, अशा सर्व बाबी प्रत्येक वापरानंतर ‘सॅनिटाइज’ व ‘स्टॅरालाइज’ करावयाच्या आहेत.

> सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व सूचनांची माहिती गिऱ्हाइकांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित करावयाची आहे.

सार्वजनिक ठिकाणांसाठी…

> सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी प्रवास करताना चेहरा झाकलेला असावा.

> सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटांचे अंतर असावे.

> दुकानांमध्ये एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देण्यास मनाई.

> अंत्यविधीसाठी पन्नासपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी नाही.

> सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत दंडात्मक कारवाई.

> सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे तसेच तंबाखू-पान खाण्यास मनाई.

मंगल कार्यालयांसाठी…

> गर्दी टाळण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लग्न कार्यांसाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाही, याची काळजी घ्यावी.

> सामाजिक वावर काटेकोरपणे पाळून विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह यामध्ये लग्न समारंभ पार पाडण्यास अटींसापेक्ष परवानगी देण्यात येणार.

कार्यालयांसाठी मार्गदर्शक तत्वे…

> शक्यतो घरुन काम करणे ( Work From Home ) अवलंबावे. या अंतर्गत कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करावेत.

> थर्मल स्क्रीनिंग करुन तापमान मोजण्याची व्यवस्था करणे, साबणाने हात धुण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे तसेच प्रवेशद्वारावर व बाहेर पडण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करणे.

> कार्यालयाचे, कार्यालयातील सुविधांचे तसेच ज्या ठिकाणी मानवी संपर्क होऊ शकतो, अशा ठिकाणांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे.

> कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सामाजिक वावर आवश्यक. दोन शिफ्टदरम्यान पुरेसे अंतर असावे. जेवणासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

CSK vs KKR: IPL 2020: ऋतुराजच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईचा केकेआरवर धडाकेबाज विजय – ipl 2020: chennai super kings beat kolkata knight riders by 6...

आबुधाबी: महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यातही धडाकेबाज अर्धशतक साकारले. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. ऋतुराजच्या या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने केकेआरवर...

india protests saudi arabia: सौदी अरेबियाच्या बँकेची नवी नोट, भारतच नव्हे तर पाकिस्तानही नाराज! – india protests saudi arabias move to exclude j k...

नवी दिल्ली: येत्या २१-२२ नोव्हेंबरला होणाऱ्या जी -20 परिषदेची अध्यक्षता सौदी अरेबियाला मिळाली आहे. यानिमित्ताने मॉनिटरी अथॉरिटी ऑफ सौदी अरेबियाने २४ ऑक्टोबरला नवीन...

Recent Comments