Home आपलं जग करियर bmc lottery for cbse icse : पालिकेच्या CBSE, ICSE शाळेची ३० एप्रिलला...

bmc lottery for cbse icse : पालिकेच्या CBSE, ICSE शाळेची ३० एप्रिलला सोडत – bmc cbse, icse schools lottery on april 30


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापालिका हद्दीत असणाऱ्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांसाठी दोन हजार ४९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या शाळांच्या प्रवेशासाठी ३० एप्रिल रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी दोन विद्यार्थी आणि पालकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डाची शाळा पालिकेच्या अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर मनपा शाळेत; तर आयसीएसई बोर्डाची शाळा माटुंगा पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही बोर्डांच्या शाळा या सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यानुसार या दोन्ही शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजी, पहिली ते सहावीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. प्रवेशासाठी पालकांनी १२ मार्चपर्यंत अर्ज केले असून सीबीएसईच्या प्रवेशासाठी दोन हजार १५४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तसेच, आयसीएसई शाळेसाठी ३४३ अर्ज आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. इयत्ता तिसरी ते सहावीच्या वर्गात किमान १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ज्या इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या ३८ पेक्षा अधिक असेल त्याच वर्गाची सोडत काढण्यात येणार आहे. २७ एप्रिलला विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून १० मे पर्यंत गुगलमार्फत अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

NCERT चं सहावी ते आठवीसाठी नवं शैक्षणिक कॅलेंडर

स्टाफ सिलेक्शन परीक्षांचे निकाल लांबणीवर

परीक्षांसाठी शिक्षण विभागाचे तीन प्लान तयार!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP government in Maharashtra: त्यांचे ‘हे’ कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा – raosaheb danve was never known as a ‘jyotishi’ but now...

मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार...

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

Recent Comments