Home शहरं मुंबई bmc’s engineering and projects department: मुंबई पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिलेची...

bmc’s engineering and projects department: मुंबई पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिलेची नियुक्ती – bmc’s engineering and projects department will be headed by a woman for the first time


मुंबईः १९८४ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अभियंता अर्चना आचरेकर यांची संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच नेमणूक त्यांची केली आहे. यापूर्वी अर्चना आचरेकर या मुंबई महानगरपालिकेच्या ‘नगर अभियंता’ अर्थात ‘सिटी इंजिनिअर’ म्हणून कार्यरत होत्या.

भारतातील अभियांत्रिकीय शिक्षणाचा पाया घालणाऱ्या मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ येथून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर श्रीमती आचरेकर या जानेवारी १९८४ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपल्या कारकिर्दी दरम्यान त्यांनी विविध खात्यातील विविध पदांवर काम केले आहे. आचरेकर यांची ‘संचालक’ पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रथमच या पदावर एक जेष्ठ महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत.

वाचाः ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही; पण अनेक गोष्टी सुरू होतील: उद्धव ठाकरे

पालिकेतही आता महिला राज असल्याचं पाहायला मिळतं आहे. महिलांकडे महत्त्वाची खाती पालिकेनं सुपूर्द केली आहेत. अर्चना आचरेकर यांच्याकडे पालिकेचे महत्त्वाचे प्रकल्प हाताळ्याची संधी देण्यात आली आहे. पादचारी पुल, घनकचरा व्यवस्थापन असे महत्त्वाचे प्रकल्प देण्यात आले आहेत.

वाचाः आषाढी वारीला जाऊन करोनाचं संकट निवारण्याचं विठ्ठलाला साकडं घालणार: CM

लॉकडाऊननंतर महानगपालिकेनं काही विकास कामे पुन्हा सुरू केली आहेत. त्यातील काही कामं ही पावसाळ्यापूर्वीचीदेखील आहेत. पावसाळ्यात मलेरिया, डेंगू यासारख्या आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून नालेसफाईच्या कामांनी वेग घेतला आहे. तसंच, रस्त्यावरील खड्डे या समस्यांसाठी पालिकेनं व्हॉट्सअॅप नंबर जारी केलं आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून ४८ तासांत तक्रारीची दखल घेतली जाणार असल्याचं आश्वासन पालिकेनं केलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Recent Comments