Home मनोरंजन bollywood news News : अभिनेत्री राधिका आपटेनं टाकलं दिग्दर्शनात पाऊल - radhika...

bollywood news News : अभिनेत्री राधिका आपटेनं टाकलं दिग्दर्शनात पाऊल – radhika aptes directorial debut film’the sleepwalkers wins award at international fest


मुंबई: गुणवान अभिनेत्री म्हणून राधिका आपटे हिनं आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनयात ठसा उमटवणारी राधिका आता दिग्दर्शनातही आपली छाप पाडू पाहतेय. राधिकानं ‘स्लीपवॉकर’ या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तिच्या या शॉर्टफिल्मची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल’मध्ये तिच्या या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झालाय. या लघुपटाला ‘बेस्ट मिडनाइट शॉर्ट पुरस्कार’ मिळाला असून, या लघुपटासाठी कथालेखनही तिनं केलंय.

राधिकानं आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता लघुपट दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळवल्यानं चाहत्यांना तिच्याकडून दर्जेदार सिनेमाची अपेक्षा आहे. या पुरस्कारासाठी राधिकानं ‘पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल’च्या आयोजकांचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार मिळाल्यानं आनंद झाल्याचं राधिकानं ट्विट केलंय.


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका म्हणाली, की ‘शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाच्या कामाचा मी खूप आनंद घेतला. मी याबद्दल खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांना ही शॉर्टफिल्म लवकरच पाहता येणार आहे. दिग्दर्शक म्हणून मला आणखी काम करण्याची संधी मिळेल.’ या लघुपटात शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

फसवा विकास; फसवी मंडळे!

अॅड. विलास पाटणे विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर गुजराती भाषिक प्रदेशात गुजराती भाषिक राज्याच्या निर्मितीची मागणी वाढली. पुढेमागे या भाषिक अस्मितेच्या लाटेमुळे ही दोन्ही...

Uttar Pradesh: सार्वजनिक ठिकाणी महिलेचे अश्लील चाळे; कोर्टाने सुनावली शिक्षा – uttar pradesh muzaffarnagar woman caught for obscene act in public place get two...

हायलाइट्स:उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील चार वर्षांपूर्वीचं प्रकरणमहिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करताना पकडले होतेकोर्टाने या प्रकरणात महिलेला ठरवले दोषीदोन दिवस तुरुंगवास आणि पाच हजार...

Recent Comments