Home मनोरंजन bollywood news News : आता बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार करोना आणि लॉकडाउन -...

bollywood news News : आता बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार करोना आणि लॉकडाउन – coronavirus bollywood to add corona sequence in movie


मुंबई : वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कुली नंबर १’ हा चित्रपट सध्या करोनामुळे रखडला आहे. देशात आणि जगभरात करोनाचा प्रादुर्भाव नसता तर, आतापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असता. पण, लॉकडाउनमुळे या सिनेमाबरोबरच इतर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण अर्ध्यावरच रखडलं आहे. त्याचं शूटिंग बऱ्याच चित्रपटांप्रमाणेच मध्येच येऊन थांबलं आहे. राज्य सरकारनं चित्रीकरणासाठी सशर्त परवानगी दिली असली, तरी बॉलिवूड सिनेमांच्या निर्मितीची व्याप्ती पाहता अद्याप कोणी निर्माता चित्रीकरणासाठी फ्लोअरवर उतरलेला नाही. दुसरीकडे बॉलिवूडनं करोनामुळे आपल्या सिनेमांच्या प्रमोशनचा फंडा बदलल्याचं दिसून येतंय.

काही दिवसांपूर्वीच वरुणच्या लूकचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यात कुली म्हणून दिसणाऱ्या वरुणच्या चेहऱ्यावर मास्क आहे. त्यामुळे आता आगामी सिनेमांच्या कथानकांमध्ये ‘करोना’ या मुद्द्याचा विचार करून काही बदल करण्यात येत असल्याचं समजतंय. यापूर्वी आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमातही असे काही बदल करण्यात आल्याची चर्चा आहे. हे असे बदल आता आगामी बॉलिवूडपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतील; असं सिनेइंडस्ट्रीचे जाणकार सांगतात. ज्या सिनेमांच्या कथानकावर सध्या काम सुरू आहे, त्यांच्या स्क्रिप्टसचं पुनर्लेखन केलं जाणार असल्याचं समजतंय. करोनानं लोकांची जीवनशैलीच बदलली आहे. अशा परिस्थितीत ज्या लेखकाला आजची कहाणी सांगायची आहे, त्यांनी आपली कथा आजच्या काळामध्ये बदलली पाहिजे; असं अनेक लेखक-दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यानुसार चित्रपटांच्या कथानकात ताजे संदर्भ आणले जात आहेत.

लॉकडाउन आणि करोनावर सिनेमे

बॉलिवूडच्या सिनेनिर्मात्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकांमध्ये ‘करोना’, ‘लॉकडाउन’ हे शब्द वापरून संबंधित सिनेमांच्या नावांची नोंदणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘करोना’ आणि ‘लॉकडाउन’ हे शब्द सध्या सिनेनिर्मात्यांच्या अधिक पसंतीस उतरत आहे. कारण, सिनेमांच्या नावांसाठी याच शब्दांना अधिक प्राधान्य असल्याचं निदर्शनास आलंय. सिनेमाची कथा ठरण्याअगोदरच सिनेमाचं शीर्षक आपल्या मालकीचं करून घेण्यासाठी निर्मात्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळतेय. त्यामुळेच सध्या प्रोडक्शन असोसिएशनकडे सिनेमासाठीच नाव निर्माते अगोदरच रजिस्टर करून ठेवत आहेत. त्याचप्रमाणे आयएमपीपीए अर्थात ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशन’कडे देखील सिनेनिर्माते करोनावर आधारित चित्रपटाची नावं नोंदवत आहेत. लवकरच चित्रपटांचं चित्रीकरण सुरू होईल. त्यामुळे येत्या वर्षात बॉलिवूडमध्ये लॉकडाउन आणि करोना या विषयांवरील सिनेमांची रांग लागण्याची शक्यता आहे.

‘हेल्मेट’ सिनेमाच्या नवीन पोस्टरमध्ये फेस शिल्ड लावलेले पारशक्ति खुराना आणि प्रनूतन बहल.

चित्रपटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

renuka mata temple: देवी तुझ्या भक्तीने तहान, भूक हरली! – navratri 2020, history of renuka mata devi mandir

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्रीफुलंब्री - राजूर रस्त्यावरील रिधोरा येथे रेणुका मातेचे भव्य मंदिर आहे. देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मात्र, यंदा करोनामुळे...

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड"वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!" या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून...

Recent Comments