वडिलांसह सायकलवरून प्रवास करणाऱ्या ज्योतीचं इवांका ट्रम्पकडून कौतुक
ज्योती कुमारीच्या या चित्रपटाचं नाव आत्मनिर्भर असं असून शाइन शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि मैथिली अशा तिन भाषांनध्ये डब करण्यात येणार आहे. चित्रपटात दिल्ली ते दरगंभा पर्यंतचा प्रवास दाखण्यात येणार असून शूटिंग सेटवर न करता रिअल लोकेशन्सवर करण्यात येणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं. तसंच ही डॉक्युमेंट्री नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
सात दिवसांत गाठले घर
ज्योतीचे वडील मोहन पासवान हे गुरुग्राम येथे ऑटोरिक्षा चालवतात. पण त्यांना दुखापत झाली आणि त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. त्यांना आपली ऑटोरिक्षा मालकाला परत करावी लागली. त्यामुळं त्यांनी आपल्या मूळ गावी दरभंगा इथं जाण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाउनमध्ये गाडी किंवा ट्रेननं बिहारला जाणं शक्य होत नव्हतं. म्हणून शेवटी तिनं आपल्या वडिलांना सायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सायकलच्या मागे असलेल्या ‘कॅरिअर’वर बसवून गुरुग्राम ते दरभंगा हे १२०० किमीचे अंतर तिनं अंतर ७ दिवसांत कापलं.
इवांका ट्रम्प यांनीही केलं कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पन यांनी ही ज्योतीची पाठ थोपटली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी तिच्या साहसाचं कौतुक केलं होतं.
सायकल फेड्रेशनकडून चाचणीसाठी बोलवण्यात आलं
ज्योतीची हिंमत पाहून सायकलिंग फेडरेशनने तिला पुढील महिन्यात चाचणीसाठी बोलावलं होतं. सायकलिंग फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओंकार सिंग म्हणाले होते की, जर ज्योती कुमारी चाचणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली तर दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत तिची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली जाईल.
लॉकडाउन आणि करोनावर चित्रपट