Home मनोरंजन bollywood news News : आत्महत्या केली तेव्हा सुशांतचा 'हा' मित्र घरीच होता...

bollywood news News : आत्महत्या केली तेव्हा सुशांतचा ‘हा’ मित्र घरीच होता – bandra police has now recorded statements of sushant singh rajputs creative manager siddharth pithani


मुंबई: बॉलिवुड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचं गूढ निर्माण झालें असून त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. त्यात आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात सुशांतचे मित्र, कुटुंबिय, मॅनेजर आणि सिनेसृष्टीतील इतर काही जणांचा समावेश आहे. बुधवारी सुशांतचा मित्र आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानी जो त्याच्याच घरात राहत होता, त्याची चौकशी करण्यात आली.

सुशांतनं आत्महत्या केली त्यावेळी सिद्धार्थ घरातच होता. असं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे. सिद्धार्थ हा सुशांतचा क्रिएिव्ह कंटेन्ट मॅनेजर काम पाहायचा. तो सुशांतच्या घरातच राहत होता. त्यामुळं या प्रकरणात त्याची चौकशी महत्त्वाची ठरत आहे. तो घरात असतानाही सुशांतनं गळफास लावून आत्महत्या केली. घरात असूनही त्याला यासंदर्भात काहीच कसं समजलं नाही… असे अनेक प्रश्न सध्या त्याला विचारण्यात येत आहेत.
आत्महत्येपूर्वी सुशांतनं गुगलमध्ये सर्च केलं स्वत:चं नाव ? पण का?
सिद्धार्थपूर्वी पोलिसांनी सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील त्याची सहअभिनेत्री संजना सांघी हिची देखील चौकशी केली. सुशांतच्या शेवटच्या दिवसातील वागणं किंवा त्याच्या वागण्यात झालेला काही बदल याबद्दलही तिला प्रश्न विचारण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे या दोघांचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २४ तारखेला प्रदर्शित होत आहे. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ‘मी टू’ या मोहिमेअंतर्गत सुशांतनं संजनासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या संदर्भातही तिला सखोल विचारण्यात आलं.मी सुशांतवर कधीही कोणतेही आरोप नव्हते, असं संजनानं पोलिसांना सांगितलं आहे. यासंदर्भात दोघांचे पर्सनल चॅट देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
सुशांतवर कोणतेही आरोप केले नव्हते; पोलीस चौकशीत संजनाचा खुलासा
फॉरेन्सिक विभागाकडून तपास
सुशांतच्या घरातून हस्तगत केलेल्या वस्तूंची फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही संभ्रम निर्माण करणारी माहिती न पसरविण्याचंही आवाहन पोलिसांनी केलं आहे. सुशांतचा बॉलिवुडमधील बड्या प्रॉडक्शन हाऊससोबत करार झाला होता. तो करार नेमका काय आहे, हे तपासण्यासाठी त्याची प्रत पोलिसांनी मागविली होती. ही प्रत आम्हाला मिळाली असून त्याविषयी तपास सुरू असल्याचंही त्रिमुखे यांनी स्पष्ट केलं.

‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचं सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचं तसेच त्याचं पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’ (एसएसआरएफ) स्थापन करण्याचंही राजपूत परिवारने जाहीर केलं आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments