Home मनोरंजन bollywood news News: उर्वशी रौतेलाचं फेसबुक अकाऊंट हॅक - urvashi rautela's facebook...

bollywood news News: उर्वशी रौतेलाचं फेसबुक अकाऊंट हॅक – urvashi rautela’s facebook account hacked mumbai police come to rescue


मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्वशीचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आही. ट्विट करत तिनं ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

उर्वशीनं ट्विट केल्यानंतर काही तासांतच मुंबई पोलिसांनी तिच्या ट्विटची दखल घेत तिची तक्रार सायबर गुन्हे विभाकडं सोपवली आहे. याबद्दल तिनं मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. माझ्या फेसबुक अकाऊंटवरून आलेल्या मेसेजला किंवा पोस्टाला रिप्लाय करू नका, असं तिनं म्हटलं आहे. या पूर्वी देखील उर्वशीचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं.

सलमानचा आवाज ऐकून पक्षी उडून जातील: केआरके

ट्विट कॉपी केलं; उर्वशी रौतेला पुन्हा ट्रोल

दरम्यान, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते.पण उर्वशीनं नुकत्याच केलेल्या ट्विटमुळं ती ट्रोल झाली होती. ऑस्कर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पॅरॅसाइट या कोरियन सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा प्रदर्शितही करण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी सिनेमा पाहून सोशल मीडियावर सिनेमाबद्दल मत व्यक्त केलं होतं. उर्वशीनं देखील यासिनेमासंदर्भात एक ट्विट केलं होतं. सिनेमासंदर्भात अनेक गोष्टी तिनं लिहिल्या होत्या. परंतू यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. उर्वशीनं केलेलं ट्विट हे कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments