Home मनोरंजन bollywood news News : काही हात निसटले... बाबांसाठी सखी गोखलेची भावूक पोस्ट...

bollywood news News : काही हात निसटले… बाबांसाठी सखी गोखलेची भावूक पोस्ट – sakhi gokhale share emotional post about her fater late actor mohan gokhale


मुंबई: ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले हिनं इन्स्टाग्रामवर एक भावुक अशी पोस्ट शेअर केली आहे. सखीनं तिच्या बाबांसाठी लिहिलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सखीनं तिचे बाबा म्हणजेच दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्यासाठी ही भावुक पोस्ट लिहिली आहे. सखीनं शाळेच्या दिवसांतला एक फोटो शेअर केलाय. शाळेच्या गणवेशात बससाठी वाट पाहणारी सखी बाबा आणि आईसोबत उभी असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.

‘हिच ती जागा आहे… जिथं माझ्या शाळेची बस मला न्यायला आणि सोडायला यायची. शाळेत जाताना निरोप देणारे आणि नंतर मी येण्याची आतुरतेने वाट पाहणारे हात मी याच ठिकाणी धरले. काही नाजूक तर काही कणखर अशा हातांमध्ये माझे हात होते. काही हातांना माझे हे छोटे हात पकडता आले नाहीत. काही हात निसटले, तर काही सापडले’, अशा आशयाची पोस्ट सखीनं शेअर केली आहे.


सखी बद्दल थोडसं…
‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील साधीभोळी रेश्मा. या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘दिल दोस्ती…’मधील जानी दोस्तांपैकी सखीची व्यक्तिरेखा तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली. मनोरंजन विश्वातील तरुण, आश्वासक चेहरा असे सखीबाबत म्हणता येईल. पहिलीच भूमिका गाजल्यानंतर तिनं थेट व्यावसायिक रंगभूमीवर उतरण्याचा निर्णय घेतला. ‘अमर फोटो स्टुडियो’ या नाटकात अभिनय करण्याबरोबरच ती त्याची सहनिर्मातीही बनली होती. ‘रंगरेज’ या हिंदी सिनेमात तिने एक छोटी भूमिका केली आहे. सखीची आई शुभांगी, वडील दिवंगत मोहन गोखले ही अभिनयातील मोठी नावे. त्यामुळं अभिनय हा तिच्या रक्तात मुरलेला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kamala Harris dance in rain: पाहा: प्रचार सभेत पावसाची हजेरी; कमला हॅरीस थिरकल्या! – us election 2020 kamala harris dances in the rain during...

फ्लोरिडा: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारासाठी जोर लावला जात आहे. प्रचारा दरम्यान काही हलके फुलके क्षणही...

aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यात ३४ हजार रुग्ण करोनामुक्त – 34 thousand patient beat coronavirus in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील सहा बाधितांचा उपचारादरम्यान घाटीसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या एक हजार ४२ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात मंगळवारी...

Rishabh Pant Try To Copy MS Dhonis Style Attempt Failed – Video धोनीचा कॉपी प्रयत्न फसला, पंतने करून घेतले हसं; पाहा शिखर धवनचा राग

नवी दिल्ली: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात काल मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सवर ( kxip vs dc) पाच विकेटनी विजय मिळवला. या विजयामुळे...

Recent Comments