Home मनोरंजन bollywood news News : नाट्यप्रेमी तरुणांची बॉलिवूडमध्ये उडी...व्हाया एकांकिका - rohit lad...

bollywood news News : नाट्यप्रेमी तरुणांची बॉलिवूडमध्ये उडी…व्हाया एकांकिका – rohit lad and guruprasad ganga cast in movie bhonsleसंजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर

एकांकिकांमध्ये काम करणाऱ्या तरुण कलाकारांना पुढे मनोरंजनसृष्टीची दारं खुली होतात. एमडी कॉलेजचे रोहित लाड आणि गुरुप्रसाद गंगा या दोन विद्यार्थ्यांनाही अशीच संधी मिळाली आणि ते ‘भोसले’ चित्रपटात झळकले. पहिल्याच सिनेमात बॉलिवूडचे बडे स्टार मनोज वाजपेयी यांच्याबरोबर काम करायला मिळाल्यानं त्यांच्यासाठी हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव होता.

‘भोसले’ हा चित्रपट नुकताच सोनी लिव्ह अॅपवर प्रदर्शित झाला आहे. भोसले काका या प्रमुख भूमिकेत मनोज वाजपेयी झळकला आहे. तसंच मुख्य भूमिकेत संतोष जुवेकर, इप्शिता चक्रवर्ती सिंग, विराट वैभव, अभिषेक बॅनर्जी, कैलाश वाघमारे असे कलाकार दिसताहेत. देवशीष मखीजा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एमडी कॉलेजचे विद्यार्थी गुरुप्रसाद गंगा आणि रोहित लाड दोघेही या चित्रपटात त्यांच्या भूमिका पार पडलेल्या आहेत. दोन्हीही मुलं अनेक एकांकिका स्पर्धा करून थिएटरशी जोडली गेलेली आहेत. गुरुप्रसादनं त्याचं कॉलेजचं शिक्षण वाणिज्य शाखेत पूर्ण केलं आहे. तर रोहित हा कला शाखेच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. या दोघांनीही ‘बत्ताशी’, ‘जय श्रीराम’, ‘ब्रह्मस्त्र’ आणि ‘दप्तर’ या एकांकिकांमध्ये काम केलं आहे. या सर्व एकांकिका एमडी कॉलेजच्या गाजलेल्या एकांकिका आहेत. त्यांना अनेक पारितोषिकंदेखील मिळाली आहेत. या एकांकिकांच्या माध्यमातून ते रंगभूमीशी जोडले गेले आहेत. ‘भोसले’ हा दोघांचाही पहिला हिंदी चित्रपट असून त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

बॉलिवूडला जोर का झटका; लॉकडाउनमुळं तब्बल १४०० कोटींचा फटका
आम्ही ऑडिशन दिली आणि शूटिंगच्या आधी त्यांनी वर्कशॉप घायला सुरुवात केली. तेव्हा आम्हा सर्वांना कळलं की आपण ज्या सिनेमामध्ये काम करणार आहोत त्या सिनेमात भोसले काकांच्या भूमिकेत स्वतः मनोज वाजपेयी सर काम करणार आहेत. आमच्यासाठी हा सुखद धक्का होता. मग आमच्यातही कामाचा प्रचंड उत्साह संचारला. त्यांच्याबरोबर काम करायला खूप माजा आली आणि सेटवरच्या त्यांच्या सहज वावरामुळे वातावरण मोकळंढाकळं असायचं.
– गुरुप्रसाद गंगा

चित्रपटासाठी ऑडिशन देण्यापासून ते शूटिंग पूर्ण होईपर्यंत आम्हाला खूप शिकायला मिळालं. हा सिनेमा म्हणजे एक कमाल अनुभव होता आमच्यासाठी. जेव्हा कळलं की मनोज सर या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहेत तेव्हा आमचा कामाचा उत्साह आणखी वाढला. दोन वर्षांपूर्वी शूटिंग सुरू झालं होतं आणि या वर्षी सिनेमा प्रदर्शित झाला. आपण केलेल्या मेहनतीचं कौतुक ऐकताना समाधान मिळतं.
– रोहित लाडSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bsnl daily 5gb data plan: BSNL च्या ‘या’ प्लानमध्ये ८४ दिवसांपर्यंत रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग – bsnl daily massive 5gb data...

नवी दिल्लीः BSNL आपल्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखी सुविधा देत आहे. या प्लानची वैधता ८४...

anil deshmukh on arnab goswami: Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांना अटक होणार?; गृहमंत्री देशमुख यांनी दिले मोठे संकेत – will take action against arnab...

मुंबई:रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः...

housewife women: घरकामामुळे जोपासता येईना आवड – women says we are most time is spend in housework therefore not getting time for passion

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागत असल्याने आपली आवड जोपासता येत नसल्याचे मत ८४ टक्के महिलांनी नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे....

Recent Comments