Home देश पैसा पैसा #BoycottChina सेबी घेणार निर्णय; चिनी कंपन्यांवर गुंतवणूकबंदी

#BoycottChina सेबी घेणार निर्णय; चिनी कंपन्यांवर गुंतवणूकबंदी


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सीमेवर चीनकडून करण्यात येणाऱ्या आगळीकीनंतर आता भारताने चारीबाजूने चीनला घेरण्याची तयारी चालवली आहे. त्यातच आता आर्थिक आघाडीवर चीनला धडा शिकवण्यासाठी देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी चिनी कंपन्यांना नाकारण्यात येण्याची दाट शक्यता आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चिनी कंपन्यांकडून होणारी गुंतवणूक थांबवण्यासाठी भांडवल बाजार नियामक सेबी आणि केंद्रीय आर्थिक मंत्रालयातर्फे विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे लवकरच चिनी कंपन्यांकडून करून होणाऱ्या गुंतवणुकीवर बंधने घालण्यात येण्याची शक्यता आहे.


चिनी गुंतवणुकीसाठी परवानगी अनिवार्य
करोनाच्या संक्रमण काळात देशातील विदेशी गुंतवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एप्रिलमध्ये मोठे पाऊल उचलले होते. सरकारने चीनसह सर्वच शेजारी देशांकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. ज्या देशांच्या सीमा भारताशी लागून आहेत, प्रामुख्याने त्या देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चीन, बांग्लादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि अफगणिस्तान या देशांतून थेट भारतात गुंतवणूक करण्यावर बंधने आली आहेत.

चीनच्या १६ संस्थांची नोंदणी
चीनमधील १६ कंपन्यांनी नुकतीच भारतात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) म्हणून नोंदणी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) आणि पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) यांचा समावेश आहे. एआयआयबी ही एक मल्टिलॅटरल डेव्हलपमेंट बँक असून, या बँकेचा भारत हा देखील एक सदस्य आहे. पीओबीसी ही चीनची मध्यवर्ती बँक आहे.

वाचा :

हाँगकाँगचे १११ कॉर्पोरेट
भारतात एफपीआयच्या अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या १११ कंपन्या हाँगकाँगशी संबंधित आहेत. त्यामध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत असणाऱ्या ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट, कोलंबिया मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स, फिशर अॅसेट मॅनेजमेंट, इन्व्हेस्को अॅसेट मॅनेजमेंट, मेपल ब्राउन अबॉट, टीटी इंटरनॅशनल आणि वेस्टवूड मॅनेजमेंट कॉर्प आदी कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्या हाँगकाँगच्या असल्या, तरी त्या चीनशी संबंधित असल्याचे मानले जाते.

स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक
चिनी कंपन्या सातत्याने भारतीय स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. आतापर्यंत चिनी कंपन्यांनी भारतीय स्टार्टअपमध्ये २६३ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. भारतीय स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांनी २०१९मध्ये १२३० दशलक्ष डॉलर आणि २०१८मध्ये १३४० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत चिनी कंपन्यांनी भारतीय स्टार्टअपमध्ये ५.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

ई-कॉमर्स धोरणांतही बदल?
चीनला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकार आयात होणाऱ्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढविण्याचा विचार सुरू केला आहे. या शिवाय ई-कॉमर्स कंपन्यांसाठीही धोरण तयार करण्याचा विचार करीत आहे. त्या अंतर्गत ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पादनांच्या निर्मितीची माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. संबंधित उत्पादन मेड इन इंडिया आहे अथवा नाही, याची माहितीही द्यावी लागणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jagannath kunte: jagannath kunte : नर्मदे SS हर हर… लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन – narmade har har writer jagannath kunte passed away

म. टा. प्रतिनिधी, पुणे: आपल्या लिखाणातून नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे आणि 'नर्मदे हर हर' या पुस्तकासाठी ( narmade har har ) अफाट लोकप्रियता...

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments