दिल्ली पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयटी अॅक्ट ६६ आणि ६७ अ नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीही सुरू केलीय. तसंच दिल्ली पोलिसांनी इन्स्टाग्रामला पत्र लिहून याची माहिती मागितली आहे.
या प्रकरणाची दखल दिल्ली महिला आयोगानेही घेतलीय. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली आहे. आता इन्स्टाग्रामवर हा ग्रुप डिअॅक्टीव्हेट करण्यात आला आहे. इन्स्टग्रामवर “boys locker room” नावच्या ग्रुपवरील स्क्रीन शॉट बघितले. बलात्काराची मानसिकता यातून समोर आलीय. या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांना नोटीस बजावली आहे. या ग्रुपमधील मुलांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करून कठोर संदेश दिला गेला पाहिजे, असं दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल म्हणाल्या. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.