Home टेकनॉलॉजी पॅक ऑनलाईन जग Brad Bender: विश्वासार्ह बातम्यांसाठी गुगल मोजणार शुल्क - google to pay some...

Brad Bender: विश्वासार्ह बातम्यांसाठी गुगल मोजणार शुल्क – google to pay some publishers for news content amid tensions with industry


वृत्तसंस्था, लंडन

इंटरनेट युजरना विश्वासार्ह बातम्या आणि मजकूर मिळावा, यासाठी शुल्क मोजण्याची तयारी गुगलने दाखवली आहे. बातम्यांसाठी कोणतेही शुल्क न भरता इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा वापर करण्याला त्यामुळे आळा बसणार असून या पावलामुळे गुगल आणि वृत्तविषयक कंपन्यांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेला वाद निवळण्याची शक्यता आहे. दर्जेदार मजकुरासाठी वृत्तपत्रे, वृत्तसंस्था या प्रकाशकांना शुल्क देण्यासाठीचा कार्यक्रम या वर्षी सुरू करणार असल्याची घोषणा गुगलने गुरुवारी केली. जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या तीन देशांमध्ये स्थानिक आणि राष्ट्रीय नियतकालिकांपासून या प्रकल्पास प्रारंभ होणार आहे.

गुगलच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष ब्रॅड बेंडर यांनी एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली. ‘या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रकाशक संस्थांना आपल्या बातम्या, मजकुरासाठी योग्य शुल्क मिळेल, तसेच त्यांचा मजकूर मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहचेल. दर्जेदार पत्रकारितेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे,’ असे बेंडर यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

या कार्यक्रमांतर्गत असलेले लेख गुगलच्या न्यूज अँड डिस्कव्हर या सेवांतर्गत उपलब्ध असतील. तसेच सध्या अनेक नियतकालिकांनी वाचकांसाठी सशुल्क उपलब्ध केलेला मजकुरही गुगलच्या माध्यमातून वाचण्यासाठी उपलब्ध होईल, त्यासाठी गुगल रक्कम मोजणार आहे.

या पार्श्वभूमीवर, फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यातच त्या देशातील स्पर्धा नियंत्रक यंत्रणेने वृत्तविषयक मजकुराचा वापर केल्याबद्दल कंपन्यांना भरपाई देण्याचे आदेश गुगलला दिले होते. तर ऑस्ट्रेलियामध्येही गुगलने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांबद्दल वृत्तविषयक कंपन्यांना भरपाई दिली जावी, यासाठी योजना आखण्यात आली आहे.

वृत्तविषयक मजकूरासाठी गुगलने जर्मनीमधील डेर स्पीजेल, फ्रँकफर्टर ऑलजेमिनी झीतुंग, डाय झेइट, टॅगेस्पीजेल, ऱ्हाइनेश पोस्ट, ऑस्ट्रेलियामधील श्वार्ट्झ मीडिया, द कॉन्व्हर्सेशन, प्रायव्हेट मीडिया आणि सॉलस्टाइस मीडिया, तर ब्राझीलमधील डायरियोस असोसिएडोस आणि ए गॅझेटा या वृत्तविषयक कंपन्यांशी करार केले आहेत.

करोनाकाळात मुद्दा ऐरणीवर

गुगलच्या व्यासपीठावर उपलब्ध होणाऱ्या बातम्यांसाठी गुगलने मूळ स्रोताला रकमेची भरपाई करावी, अशी मागणी वृत्तपत्र जगताकडून गेली अनेक वर्षे सातत्याने होत आहे. सध्याच्या करोना विषाणूच्या आपत्तीच्या काळात वृत्तपत्रांना जाहिरातींच्या रूपाने मिळणारा महसूल मोठ्या प्रमाणात घटल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Vice Admiral MS Pawar: नौदल उपप्रमुख एम. एस. पवार यांना परम विशिष्ट सेवा पदक – naval deputy chief ms pawar awarded the distinguished service...

म.टा. प्रतिनिधी, मुंबईप्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म आणि इतर महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली असून नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल एम. एस....

england: IND vs ENG : भारतीय संघाला धोक्याचा इशारा, इंग्लंडने श्रीलंकेला केलं चारी मुंड्या चीत – ind vs eng : england won the test...

नवी दिल्ली : भारतामध्ये दाखल होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाने एक धोक्याचा इशारा दिला आहे. इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच माती चारी मुंड्या चीत करत कसोटी मालिका...

Recent Comments