Home ताज्या बातम्या #BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण, BREAKING Another cabinet...

#BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण, BREAKING Another cabinet minister from Maharashtra found corona positive mhas | News


महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

विनया देशपांडे, मुंबई, 24 मे : महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. स्थिती असूनही नियंत्रणात असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण (corona positive) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र अशातच या जागतिक संकटात रस्त्यावर उतरून लढताना राजकीय नेत्यांनाही हा व्हायरस लक्ष्य करू लागला आहे. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचं कळतंय.

दरम्यान, कोरोना रुग्णाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जाऊ शकतं, त्यामुळे सरकारने कोरोनाबाधितांची नावे जाहीर करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचं नावंही उघड करता येणार नाही.

याआधीही एका मंत्र्याला झाला होता कोरोना संसर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. आव्हाड यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि अत्यंत कठीण स्थिती त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनाला हरवल्यानंतर स्वत: आव्हाड यांनीच पुढे येत मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं होतं. मात्र तोपर्यंत त्यांचंही नाव कोरोनाबाधित म्हणून उघड करण्यात आलं नव्हतं.

संपादन – अक्षय शितोळे

First Published: May 24, 2020 11:31 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Virender Sehwag Make Comment On Fast Bowler Mohammed Siraj – IND vs AUS : मोहम्मद सिराजवर वीरेंद्र सेहवागने केली खास टिप्पणी, ट्विट झाले व्हायरल...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आजचा चौथा दिवस चांगलाच गाजवला. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच...

Natasa Stankovic Shares Emotional Post For Hardik Pandya Father – ‘आपलं घर शांत झालं,’ सासऱ्यांच्या निधनावर नताशा स्टॅनकोविकने शेअर केली भावुक पोस्ट | Maharashtra...

मुंबई- क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचे वडील हिमांशू पांड्या यांचं नुकतच निधन झालं. हिमांशू यांची सून आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आपल्या सासऱ्यांच्या आठवणीत अनेक...

jee neet exam questions: JEE Main, NEET मधील प्रश्न सुधारित अभ्यासक्रमानुसार – jee main neet 2021 exam questions will be based on revised syllabus...

आगामी जेईई, नीट परीक्षांमध्ये सुधारित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. केंद्रीय विद्यालयांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत...

motorola nio: ६ कॅमेरे आणि पॉवरफुल बॅटरीसोबत मोटोरोलाचा ‘हा’ नवा फोन येतोय – motorola nio coming with 6 camera and powerful battery processor

नवी दिल्लीः भारतात सर्वात स्वस्त ५जी मोबाइल Motorola Moto G 5G लाँच करण्यात आल्यानंतर स्मार्टफोन कंपनी मोटोरोला लवकरच भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन...

Recent Comments