Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल broadband users: ...म्हणून ब्रॉडबँडच्या वापरकर्त्यांमध्ये ५७ टक्क्यांनी वाढ - broadband users increased...

broadband users: …म्हणून ब्रॉडबँडच्या वापरकर्त्यांमध्ये ५७ टक्क्यांनी वाढ – broadband users increased 57 percentage in lockdown


नीरज पंडित

लॉकडाउनच्या काळात बहुतेक लोकांना घरी बसावं लागलं. वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम, क्लास फ्रॉम होमबरोबरच मनोरंजनासाठी इंटरनेटच्या वापरात वाढ झालीय. यंदा प्रथमच मोबाइल डेटापेक्षा जास्त पसंती ब्रॉडबँड सेवेला आणि विशेषत: वायफायला असल्याचं समोर आलं आहे. मार्च महिन्यापासून ब्रॉडबँडच्या वापरकर्त्यांच्या संख्येत सुमारे ५७ टक्के वाढ झालीय. मोबाइल डेटा फोरजी झाल्यामुळे मंदावलेल्या या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे.

वाचाः २१ जून रोजी मोठा सायबर अटॅक, ६ देश निशाण्यावर

या कालावधीत सुमारे ३३ टक्के ब्रॉडबँड वापरकर्त्यांनी आपल्या सध्याच्या प्लॅनमध्ये बदल करत जास्त डेटा पॅकचे प्लॅन घेतले आहेत. तर सुमारे ४० टक्के युजर्सनी स्पीड वाढविला आहे. याचबरोबर ब्रॉडबँड कंपन्यांनीही २०० एमबीपीएसचे प्लॅन्स बाजारात आणले आहेत. त्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं ‘ईआय डिजिटल कन्झुमर सर्व्हे’मध्ये स्पष्ट झालं आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात ब्रॉडबँडला पसंती मिळाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. या कालावधीत १२०० एमबपीएसचा वेग देण्याची क्षमता असलेल्या वायफाय राऊटर्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. ग्राहकांची पसंती ही १०० ते ३०० मीटरपर्यंत रेंज पोहोचेल अशी अशा राउटर्सना होती, असंही यात समोर आलं आहे. यामध्ये सध्या विविध नाविन्यपूर्ण राऊटर्स उपलब्ध आहेत. ज्यात मोबाइल राउटर्सचाही समावेश आहे. त्याच्या मागणीत ४० टक्के वाढ झाल्याचं समोर आलंय.

वाचाः फ्लिपकार्टवर सेलः स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या सर्वकाही

लॉकडाउनच्या काळात देशातील सर्व प्रकारच्या इंटरनेट वापरामध्ये ३० टक्के वाढ झाल्याचही नोंद ‘डिजिटल कन्झ्युमर सर्वे शेपिंग द न्यू नॉर्मल’ या पाहणीत समोर आलं आहे. या पाहणीत सहभागी झालेल्या २६०० युजर्सपैकी ७६ टक्के युजर्सकडे जास्त डेटा असलेले इंटरनेट होते. तर २४ टक्के युजर्सकडे प्राथमिक इंटरनेट सुविधा होती. सुमारे ११ टक्के टूजी ग्राहकांनी फोरजी इंटरनेटला पसंती दिली आहे.

महिन्याला ११ जीबी डेटा

या कालावधीत प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान ११ जीबी डेटा वापरू लागली आहे. तर देशातील इंटनेट वापरात ३० टक्के वाढही नोंदविण्यात आली आहे. यामुळे सध्या सुमारे ९० टक्के भारतीय स्ट्रिमिंग करू लागले आहेत. या वापरामुळे पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधीत धरलेला अंदाज आता काही महिन्यांतच पूर्ण झाला आहे. यामुळे येत्या काळात देशात मोठ्या प्रमाणावर इंटरनेट मार्केट उपलब्ध असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

लॉकडाउनच्या काळातील वायफायचा वापर

– लॉकडाउनपूर्वी ९ ते २२ मार्च या कालावधीत – ९.८ टक्के

– १३ ते १९ एप्रिल – ११.७ टक्के

– ११ ते १७ मे – १०.२ टक्के

– १८ ते २४ मे – ९.९ टक्के


पाहणीतील निष्कर्ष

– ९० टक्के युजर्स – स्ट्रीमिंग, ई-लर्निंग, इन्फोटेन्मेंट आणि सोशल मीडियावर वेळ घालवतात.

– ६१ टक्के युजर्स लॉकडाउनच्या काळात व्हिडीओ स्ट्रिमिंगकडे वळले आहेत.

– ४.२ तास – इतके तास आठवड्याला स्ट्रिमिंग होते. लॉकडाउनपूर्वी हा कालावधी दीड तास इतका होता.

– ६० टक्के युजर्स हे व्हिडीओ ऑन डिमांडला अधिक पसंती देत आहेत.

– २० टक्के युजर्स हे टीव्हीवरील मनोरंजनाला पसंती देताय.

– ५० टक्के टीव्हीवरील प्रक्षेक हे चित्रपट, मालिका आणि बातम्या पाहणं पसंत करतात.

वाचाः गुगलने हटवले ३० अॅप, फोनमधून तात्काळ डिलीट करा

वाचाः लावा आणि कार्बन सुद्धा घेऊन येतेय स्वस्त स्मार्टफोनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP: शिवसेना-भाजपमधील विसंवाद वाढला; ‘हा’ ठरला कळीचा मुद्दा – bjp has criticized shivsena over bmc development fund distribution

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई पालिकेतील स्थायी समितीतील असमान विकास निधी वाटपावरून शिवसेना आणि भाजपमधील विसंवाद आणखी वाढत चालला आहे. विकास निधीतील दुजाभाव...

mumbai-goa highway widening project: मुंबई-गोवा महामार्गाला विलंब का?; हायकोर्टात याचिका – why is the mumbai-goa highway widening project slow; petition file in bombay high...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे २०१०मध्ये सुरू झालेले काम आता पूर्णत्वाच्या मार्गाला आहे. मग २०१०मध्येच सुरू झालेल्या मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण...

Recent Comments