Home देश bulandshahr murder: धक्कादायक! ६ वर्षीय बहिणीची भावानं ठोसे मारून केली हत्या -...

bulandshahr murder: धक्कादायक! ६ वर्षीय बहिणीची भावानं ठोसे मारून केली हत्या – 20 year old brother beaten his sister to death in uttar pradesh


बुलंदशहर: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवण उधळले म्हणून राग अनावर झाल्याने मानसिक संतुलन ढासळलेल्या २० वर्षीय भावाने आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या बहिणीची ठोसे मारून हत्या केली. मुलीचा मृतदेह गावाबाहेरील एका शेतात आढळून आला. आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव प्रजापती हा गेंदपूर-शेखपूरमध्ये राहतो. त्याचे जेवण उधळले म्हणून तो सहा वर्षांच्या बहिणीवर नाराज होता. रविवारी सकाळी साधारण ११ वाजता गौरव आपल्या लहान भाऊ सौरव (वय ११), बिट्टू (७.५ वर्षे) आणि सहा वर्षीय बहिणीसोबत रानात खजूर खाण्यासाठी गेला. काही वेळानंतर त्याने भावंडांना घरी जाण्यास सांगितले. त्यांची घरी परतण्याची इच्छा नव्हती. मात्र, गौरवने त्यांना धमकावले. त्यामुळे ते घरी निघून गेले.

दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायला अन् जीव गमावला

बायकोचा खुनी तुरुंगातून जामिनावर सुटला अन् जे घडलं ते भयानक

त्यानंतर गौरवने लहान बहिणीच्या चेहऱ्यावर ठोसे मारून तिला जखमी केले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ठोसे मारल्याने बहिणीचा जागीच मृत्यू झाला. काही ग्रामस्थांना गावाबाहेरील शेतात तिचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

धक्कादायक! मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात महिला डॉक्टरचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

एकतर्फी प्रेमातून शेजारील तरुणाने घातल्या गोळ्या; तरुणीसह वडील ठारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments