Home देश पैसा पैसा business news News : फंडधारक झाले निर्धास्त - the fund holder became...

business news News : फंडधारक झाले निर्धास्त – the fund holder became indifferent


रिझर्व्ह बँकेच्या उपायांमुळे रीडम्प्शनच्या प्रमाणात कमालीची घट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

म्युच्युअल फंड कंपन्या व त्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये गेल्या काही दिवसांत निर्माण झालेली काळजी व चिंता दूर करण्यात रिझर्व्ह बँकेला यश आल्याचे दिसत आहे. अतिजोखमीच्या फंडांमधून (क्रेडिट रिस्क फंड) गुंतवणूक काढून घेण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली असल्याची माहिती अॅम्फीतर्फे रविवारी देण्यात आली.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड व्यवसायात रोख तरलतेचा अभाव दिसून येत होता. त्यानंतर फ्रँकलिन टेम्पल्टन या अमेरिकी कंपनीने आपल्या सहा डेट योजना अचानक बंद केल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची घबराट परसली. लॉकडाउनचा कालावधी लांबल्यास फंड व्यवसायासह आपली गुंतवणूकही धोक्यात येईल अशी भावना गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली होती. यामुळे रिझर्व्ह बँकेने तातडीने हस्तक्षेप करून फंड व्यवसायातील तरलतेसाठी एक विशेष निधी योजना घोषित केली. यानुसार फंड परताव्यांसाठी (रीडम्प्शन) आरबीआयने बँकांना ५० हजार कोटी रुपयांचा विशेष निधी दिला. यानंतर फंडांमधील विशेषत: अतिजोखमीच्या फंडांतून पैसे काढून घेण्याच्या प्रमाणात तब्बल ८१.५ टक्के घट झाली, अशी माहिती अॅम्फीचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी दिली.

फ्रँकलिन टेम्पल्टनच्या प्रकरणानंतर २४ एप्रिलला सुमारे तीन हजार कोटी रुपयांवर असणारे रीडम्प्शन २७ एप्रिलला ४,२९४ कोटी रुपयांवर पोहोचले. मात्र त्यानंतर म्हणजे आरबीआयच्या उपयायोजनेनंतर हे प्रमाण कमी होत गेले. २८, २९ आणि ३० एप्रिलला फंड रीडम्प्शनचा आकडा अनुक्रमे १,८४७ कोटी, १,२५१ कोटी व ७९३ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला, असे शहा यांनी सांगितले.

क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय?

क्रेडिट रिस्क फंड हा डेट फंडांचा एक प्रकार आहे. डेट फंडांत त्यांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे पाच टक्केच आहे. मात्र, त्यातून अन्य फंडांच्या तुलनेत कितीतरी अधिक परतावा मिळण्याची शक्यता असल्याने अनेक गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करतात. या अधिकच्या परताव्यासाठी या फंडात जमा झालेले पैसे हे अतिजोखमीच्या व कमी मानांकन असलेल्या निधींमध्ये गुंतवले जातात. म्हणूनच हे फंड अतिजोखमीचे ठरतात.

फ्रँकलिनचे प्रकरण

फ्रँकलिनने फ्रँकलिन इंडिया टेम्पल्टन लो ड्युरेशन फंड, फ्रँकलिन इंडिया टेम्पल्टन इन्कम ऑपॉर्च्युनिटी फंड, फ्रँकलिन इंडिया टेम्पल्टन क्रेडिट रिस्क फंड, फ्रँकलिन इंडिया टेम्पल्टन शॉर्ट टर्म इन्कम प्लॅन, फ्रँकलिन इंडिया टेम्पल्टन शॉर्ट बाँड फंड आणि फ्रँकलिन इंडिया टेम्पल्टन डायनॅमिक अॅक्र्युअल फंड या योजना तरलतेच्या अभावी (लिक्विडिटी) बंद केल्या. या फंड योजनांमध्ये झालेली गुंतवणूक कमी रेटिंगच्या बाँडमध्ये (रोखे) करण्यात आली होती. त्यामुळे रोख तरलतेची समस्या निर्माण झाली. त्यातच रीडम्प्शनमुळे फंडांनी रोख्यांची कमी किमतीला विक्री केली. त्यामुळे फंडांच्या पोर्टफोलिओंच्या दर्शनी मूल्यामध्ये घट निर्माण झाली.

विदेशी गुंतवणूकदारांचे विक्रीसत्र कायम

शेअर बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मात्र समभागविक्रीचे सत्र कायम ठेवले आहे. एप्रिलमध्ये या गुंतवणूकदारांनी एकूण १५,४०३ कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ६,८८४ कोटी रुपयांची इक्विटी व ८,५१९ कोटी रुपयांच्या डेट फंडांचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये याहून कितीतरी अधिक म्हणजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेली होती. एफपीआय व एफआयआयचा कल हा शेअर बाजारांवरील विश्वासाचा निदर्शक मानला जातो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments