Home देश पैसा पैसा business news News : सणासुदीचा हंगाम ; या बॅंकेने गृहकर्ज केले स्वस्त...

business news News : सणासुदीचा हंगाम ; या बॅंकेने गृहकर्ज केले स्वस्त – kotak bank cut home loan interest rate


मुंबई : करोना संकटात बँकांना कर्ज वितरणासाठी सवलत योजनांचा आधार घ्यावा लागत आहे. याआधीच मागील सहा महिने कर्ज वितरण ठप्प झाले होते. आता सणासुदीत कर्जाची मागणी वाढण्यासाठी बँकांनी व्याजदर कपातीला प्राधान्य दिले आहे. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला आहे.

कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्ज दर ७ टक्के केला आहे. सध्या भारतीय स्टेट बँकेचा गृहकर्जदर हा सर्वात कमी म्हणजे ७ टक्के आहे. आता इतकाच व्याजदर कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांना ऑफर केला आहे. याशिवाय बँकेने कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. किरकोळ कर्जे आणि कृषी कर्जे ऑनलाईन मंजूर केली जात असल्याचे बॅंकेने म्हटलं आहे.

सोने-चांदी ; आज सोने झाले स्वस्त तर चांदी महागली
एकीकडे करोना संकटात कर्जदारांकडून सहा महिने कर्जवसुली न करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे बँकांची आर्थिक कोंडी झाली. सध्या लोन मोरॅटोरियमची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या काळात कर्ज वसुली स्थगित असली तरी बँकांमधील ठेवींचा ओघ वाढल्याचे दिसून आले आहे. कर्जाची मागणी घटली. सध्या कर्ज वितरणाचा वृद्धिदर ६ टक्के इतका नीचांकी स्तरावर आहे.

समृद्धीच्या नव्या वाटा; करोनानंतर भारतीय कंपन्यांचा डिजिटल परिवर्तनापलीकडे विचार
भारतीय अर्थव्यवस्था आता करोना संकटातून सावरत असून ती पूर्वपदावर येत असल्याचे कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षा शांती एकांबरम यांनी सांगितले. बाजारात सकारात्मक संकेत दिसत असून ग्राहक पुढाकार घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. कोटक बँकेने कार तसेच दुचाकी कर्जावरील प्रक्रिया शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. पुढील महिनाभर ही सवलत योजना सुरु राहील, असे बँकेनं म्हटलं आहे.

विमा नियामकाचा निर्णय; देशात यापुढे ‘सरल जीवनविमा’ अनिवार्य
एचडीएफसी बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात
आघाडीची खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे एक आणि दोन वर्षांच्या मुदतठेवींवर आता कमी व्याज मिळणार आहे.एक वर्षाच्या मुदतठेवीवर ४.९० टक्के आणि दोन वर्षाच्या मुदतठेवीवर ५ टक्के व्याज मिळणार आहे. नवीन व्याजदरांची अंमलबजावणी १५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये बँकेने व्याजदरात कपात केली होती. कॅनरा बँकेने सहा ऑक्टोबरला दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रुपयांच्या मुदतठेवीवर मिळणाऱ्या व्याजदरात बदल केले होते. बँकेने काही ठरावीक मुदतीच्या व्याजदरात वाढ आणि काही योजनांच्या व्याजदरात घट केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rain in Nashik: ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार – nashik also received heavy rains in october month

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर...

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Recent Comments