Home देश पैसा पैसा business news News : सिल्व्हर लेकची जिओत गुंतवणूक - jio's investment in...

business news News : सिल्व्हर लेकची जिओत गुंतवणूक – jio’s investment in silver lake


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फेसबुकशी ४३,५७४ कोटी रुपयांचा करार केल्यानंतर रिलायन्स समूहाने आपल्या जिओ प्लॅटफॉर्ममधील १.१५ टक्के भांडवली हिस्सा सिल्व्हर लेक या अमेरिकी कंपनीला विकला आहे. यातून सिल्व्हर लेक रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ५,६५५.७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

आघाडीची अमेरिकी कंपनी असणाऱ्या सिल्व्हर लेक कंपनीने जगभरातील अनेक अव्वल कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानविषयक गुंतवणूक केली आहे. या करारानुसार सिल्व्हर लेककडून करण्यात येणाऱ्या ५,६५५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे या कंपनीला जिओमध्ये ४.९ लाख कोटी रुपयांचे इक्विटी मूल्य मिळेल. विशेष म्हणजे फेसबुकने रिलायन्स समूहात केलेल्या इक्विटी गुंतवणुकीच्या तुलनेत हे मूल्य १२.५ टक्के अधिक असेल. रिलायन्सची उपकंपनी असणाऱ्या जिओची ग्राहकसंख्या सुमारे ३९ कोटी आहे. सिल्व्हर लेकने एअरबीनबी, अलिबाबा, अँट फायनान्शियल, अल्फाबेट्स टूअर आणि वेमो युनिट्स, डेल टेक्नॉलॉजीज, ट्विटर यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये एकूण ४० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

“भारतीय डिजिटल इको-सिस्टीमच्या विकासात सिल्व्हर लेकचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभेल. याचा फायदा सर्व भारतीयांना होईल. जागतिक स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसह सिल्व्हर लेकची भागीदारी असून या कंपनीच्या अनुभवाचा आपल्या देशातील डिजिटल क्षेत्राला निश्चित लाभ होईल,” अशी प्रतिक्रिया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments