CA Exams: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाने सीए फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी करण्याची तारीख वाढवली आहे. या कोर्ससाठी विद्यार्थी आता ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकतात. ही मुदत आधी ३० जून पर्यंत होती.
कोण करु शकतं अर्ज?
इन्स्टिट्यूटने हे सांगितलं आहे की जे उमेदवार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये सिनिअर सेकेंडरी परीक्षांमध्ये एक किंवा अधिक पेपरला बसले आहेत, ते देखील या कोर्सला नोंदणी करू शकतात. याव्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी सीनिअर सेकेंटरी परीक्षा दिली आहे, ते देखील या कोर्ससाठी अर्ज करू शकतात.
अकरावी ऑनलाइन प्रवेशांची नोंदणी १५ जुलैपासून
असा करा अर्ज
– सर्वात आधी ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.org वर जा
– तेथे मागितलेला तपशील भरून नोंदणी करा
– नोंदणी पूर्ण केल्यानंतर अर्ज भरा
– आता शुल्क भरण्याच्या कॉलमवर जाऊन शुल्क भरा.
अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.